हैदराबाद : आतापर्यंत आपण अतिक्रमण कारवाईबाबत (Encroachment) ऐकलं पाहिलं आणि अनुभवलं असेल. पण ही कारवाई केली जाते ती सर्वसामान्य नागरिकांच्या घरांवर, दुकानांवर. पण, तुम्ही कधी एका आमदाराने किंवा मंत्र्याने रोड विस्तारिकरणात बाधा येणारं स्वतःचं घर पाडलंय असं ऐकलं आहे का? नाही ना? परंतु, तेलंगणात भाजपच्या (BJP MLA) एका आमदाराने रस्ता विकासात अडथळा निर्माम करणारं स्वतःचं घर पाडलं आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. आता हा आमदार साधासुधा नाही तर, या पठ्ठ्यानं नुकत्याचं झालेल्या तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी आणि BRS चे सर्वेसर्वा केसीआर यांना पराभूत करत धूळ चारली होती. (Kamareddy Bjp MLA K Venkata Ramana Reddy Demolishes Own House For Road Widening)
किंडल अन् टिंडरमध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती गोंधळले; अचानक बदललं कोर्टरूमचं धीरगंभीर वातावरण
तेलंगणातील कामारेड्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे कटिपल्ली वेंकट रमना रेड्डी (KVR) हे आमदार आहेत. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्ये केसीआर आणि विद्यमान मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांना परभूत करत जाएंट किलर म्हणून ओळख मिळवली आहे. KVR यांच्या या विजयानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी अडचणीचं ठरणारं स्वतःचं घर पाडण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचं कौतुक केले जात आहे.
मोठी बातमी : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ जाहीर; PM मोदींनी केली घोषणा
कामारेड्डी-अडलूर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नुकतीच पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी काही मालमत्ता जमीनदोस्त करणे आवश्यक होते. यात भाजप आमदार KVR यांच्या घराचाही समावेश होता. ही बाबत अधिकाऱ्यांकडून समजताच KVR यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःहून अधिकाऱ्यांना घर पाडण्याची परवानगी दिली. स्वतःचे घर पाडण्याची परवानगी देऊन मी फार मोठी सेवा करत आहे, असे मला वाटत नाही. हा निर्णय मी कामरेड्डीतील जनतेच्या सोयीसाठी घेतल्याचे KVR यांनी म्हटले आहे.
सीबीएसईच्या पुस्तकात डेंटिंग, रोमान्सचे धडे…; 9 वीचे पुस्तक सोशल मीडियावर व्हायरल
यापूर्वी आपण अनेक ठिकाणी अतिक्रमण केलेल्या ठिकाणी कारवाई गेलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्याचे किंवा त्यांच्यासोबत बाचाबाची झाल्याचे बघितले असेल. अनेक प्रकरणांमध्ये कारवाई होऊ नये म्हणून अनेक राजकीय नेतेदेखील हस्तक्षेप करताना दिसून येतात. मात्र, तेलंगणात KVR यांनी नागरिकांना मोठा रस्ता मिळावा यासाठी स्वतःचे घर जमीनदोस्त करण्यास परवानगी दिल्याने त्यांच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. KVR यांच्यासारखा नव्हे तर, ज्या ठिकाणी अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे ती थांबवण्याऐवजी नागरिकांना अडचणींना सामोरे न जाता शहराचा आणि देशाचा विकास कसा होईल याचे राजकारण करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित होत आहे.