Pune Encroachment Action: फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमण कारवाईदरम्यान स्टॉल लाथेने उडवले

Pune Encroachment Action: फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमण कारवाईदरम्यान स्टॉल लाथेने उडवले

Pune Encroachment Action: फर्ग्युसन रस्त्यावरील उपायुक्तांनी व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई केल्याने स्टॉलधारक आणि नागरिक अवाक झाले. त्यांनी सगळे स्टॅाल लाथेने उडवून लावले आहे, एकीकडे शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे अतिक्रमण असताना अशा लहान स्टॉल धारकांवर कारवाई होत असल्याने काही नाराज स्टॉल धारकांनी महापालिका आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LetsUpp Marathi (@letsupp.marathi)


महापालिका आयुक्तांकडे ही तक्रार करण्यात आली असून, माधव जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्टॉलधारकांसह सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. ‘फर्ग्युसन रस्त्यावरील बेकायदा व्यावसायिकांच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत. रस्त्यावरील काही परवानाधारकांनी कारवाई विरोधात न्यायालयात अर्ज करून स्थगिती आणली आहे.

मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकला अन् 53 वर्षीय संजय माताळेंनी थेट धरणात उडी घेतली

हे व्यावसायिक वगळून इतर सर्व व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. परवानाधारक स्टॉल्सचे योग्य जागी पुनर्वसन केले जाईल. फर्ग्युसन रस्त्यावर बेकायदेशीपणे व्यवसाय केला जात आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याविरोधात महापालिकेकडे व पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज कारवाई झाली. अशा प्रकारे शहरातील इतर भागातही कारवाई करावी अशी मागणी आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube