मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकला अन् 53 वर्षीय संजय माताळेंनी थेट धरणात उडी घेतली

मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकला अन् 53 वर्षीय संजय माताळेंनी थेट धरणात उडी घेतली

Khadakwasla Dam accident : पुण्यातील खडकवासला धरणात दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यामध्ये एका लग्नानिमित्त बुलढाण्याहून आलेल्या नऊ मुली कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या होत्या. यावेळी एक मुलगी पाय घसरुन पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी आठ जणींनी पाण्यात उडी घेतली मात्र दुर्दैवाने त्याही बुडू लागल्या. परंतु यातील सात जणींचे प्राण वाचले असून दोघी जणींना जलसमाधी मिळाली. नऊपैकी आठ जणींचे वय 16 वर्षाखालील होते.

यातील चार मुली व एक महिला अशा पाच जणींना एका धाडसी शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामु जीवदान मिळाले आहे. संजय सिताराम माताळे (वय 53 रा. गोऱ्हे खुर्द ता. हवेली) असे या देवतूत बनून आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यामुळे त्यांच आता सर्व स्तरातून कौतुख होत आहे.

आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत सावडण्याचा विधी सुरू होता. या विधीला संजय माताळे हे देखील उपस्थित होते. अचानक संजय माताळे यांच्या कानावर काही मुलींच्या ओरडण्याचा आवाज पडला. त्यानंतर माताळे यांच्यासह सर्वजण धरणाच्या भिंतीजवळ गेल्यावर मुली बुडत असल्याचे दिसले. त्यावर माताळे यांनी धावत जाऊन पाण्यात उडी मारली. तोपर्यंत मुलींच्या नाका तोंडामध्ये पाणी गेल्याने बेशुद्ध पडल्या होत्या.

महावसुली सरकारने मृतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लंय, देवेंद्र फडणवीसांचा आरोप…

त्यामुळे त्यांना बाहेर काढणे कठीण झाले होते. पण एक एक करून 4 मुलींना आणि एका महिलेला बाहेर आणल्यावर, त्या सर्व मुलींना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. पण दोन मुलींचा जीव वाचवू शकलो नाही. या गोष्टीची खंत कायम राहील अशी भावना यावेळी माताळे संजय यांनी व्यक्त केली.

ओरडण्याचा आवाज आला तसा मी पळालो आणि पाण्यात उडी घेतली. माझ्या मागे काही लोक मदतीसाठी आले होते. पाच जणींना मी बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले व काठावर थांबलेल्यांकडे दिले. दोघी माझ्या हाताला लागल्या नाहीत. मित्र, नातेवाईक खुप फोन करत आहेत. खुप चांगलं काम केलं असं म्हणत आहेत. पण माझे डोळे भरुन येत आहेत. असं संजय माताळे म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube