Jarakiholi Brothers MLA : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसनं (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 224 जागा असलेल्या कर्नाटकमध्ये पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. तर 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची (BJP) संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला (JDS)19 जागा मिळाल्या. काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी दोन प्रबळ दावेदार होते.
त्यात पहिले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दुसरे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार(D.K. Shivakumar). काही दिवसांच्या मंथनानंतर कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. त्यानंतर आता आज कर्नाटक सरकरचा शपथविधी पार पडला.
पण या सगळ्यामध्ये चर्चा होती ती जारकीहोळी बंधूंची. सरकार कुणाचेही असो जारकीहोळी यांच्या घरामध्ये मंत्रीपद फिक्स असते. कर्नाटकमध्ये सत्तेत काँग्रेस येऊ दे किंवा भाजप यांच्याघरात एककडे तरी मंत्रीपद असतेच. जारकीहोळी बंधूंचे कर्नाटकच्या राजकारणामध्ये आपले असे एक वेगळे स्थान आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी आपली ताकद कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांची कायम मंत्रीपदावर वर्णी लागलेली आहे. आज झालेल्या सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्येदेखील जारकीहोळी यांच्या कुटूंबातील एका भावाची मंत्रीपदी वर्णी लागलेली आहे.
9 Years of Modi Government : ऐतिहासिक कार्यकाळातील 9 वादळी निर्णयांचा आढावा
यंदाच्या कर्नाटक निवडणुकीत बेळगावमध्ये या तीन भावांचा विजय झाला आहे. या तीन भावांपैकी एकाने काँग्रेसकडून तर एकाने भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढवली. यावेळी सतीश जरकीहोळी यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. ते यमकनमर्दी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.
तर भालचंद्र जारकीहोळी हे अरभावी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले. त्यांनी अपक्ष उमेदवार भीमप्पा गुंडप्पा गडग यांचा पराभव केला. तसेच रमेश जारकीहोळी यांनी गोकाक विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी जोरदार विजय मिळवला आहे.
‘आधी पोलीस प्रशासनात दबदबा तर निर्माण करा’; अजितदादांनी टोचले फडणवीसांचे कान
जारकीहोळी बंधूनी कायमच कर्नाटकच्या राजकारणात आपला दबदबा ठेवला आहे. जारकीहोळी हे एकुण पाच भाऊ आहे. यापैकी चार जण राजकारणात सक्रीय आहेत. यांच्यातील तिघे जण आता विधानसभेत आहे तर लखन जारकीहोळी हे विधानपरिषदेवर आमदार आहेत.