Download App

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा पाय खोलात, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल!

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलायं.

Sidharamaiyya : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण (MUDA) जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलीयं. त्यांच्या मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवण्यात आलायं.

मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकाची क्वालिटी का?, शालेय गणवेशावरून रोहित पवारांची टीका

म्हैसूरस्थित लोकायुक्त पोलिसांकडून या प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी प्राथमिक गुन्ह्याची नोंद केली होती. यामध्ये पत्नी बी.एम पार्वती, मेहुणे मल्लिकार्जून स्वामी, देवराजू यांची नावे आहेत. स्वामी यांनी जमीन खरेदी करुन पार्वती यांनी दिली होती.

IIFA 2024: रॉकस्टार डीएसपीच्या ‘ऊ अंटवा’वर SRK आणि विकी कौशलला आयफा स्टेजवर खास परॉर्मन्स

मागील आठवड्यात विशेष न्यायालयाने सिद्धरामय्या लोकायुक्त पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. सिद्धरामय्या यांच्यावर त्यांच्या पत्नी बीएमसह MUDA ने खटला दाखल केला होता. पर्वती यांच्यावर 14 जागा वाटपांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांची एफआयआर उच्च न्यायालयाने राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या पत्नीला 14 भूखंड वाटपातील अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय कायम ठेवला होता.

‘हा’ आपला नाहीच, शरद पवारांचा माणूस; जुन्या दिग्गजांशी जुळवून घेतानाचा किस्सा शिंदेंनी सांगितला

दरम्यान, ईडीला आरोपींना चौकशीसाठी बोलावण्याचा आणि तपासादरम्यान त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार असून विरोधक मला घाबरले आहेत, या प्रकरणात मला टार्गेट केलं जात आहे, माझ्याविरोधात हा पहिलाच ‘राजकीय खटला’ असल्याचेही सिद्धरामय्या यांनी सांगितले.

काय म्हणाले सिद्धरामय्या?
विरोधक घाबरले असून ते मला टार्गेट करीत आहेत. माझ्याविरोधात हा पहिलाच राजकीय खटला असून मी चौकशीनंतरही राजीनामा देणार नाही, कारण मी चुकीचं काम केलेलं नाही. मी कायदेशीर लढाई लढणार असल्याचं सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलंय.

follow us

संबंधित बातम्या