‘हा’ आपला नाहीच, शरद पवारांचा माणूस; जुन्या दिग्गजांशी जुळवून घेतानाचा किस्सा शिंदेंनी सांगितला

  • Written By: Published:
‘हा’ आपला नाहीच, शरद पवारांचा माणूस; जुन्या दिग्गजांशी जुळवून घेतानाचा किस्सा शिंदेंनी सांगितला

Sushilkumar Shinde On Mohite and Jagtap : अकलूज येथे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा मोहिते कुटुंबाकडून आयोजित करण्यात आला होता. आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांनी अनेक जुने किस्से सांगितले. राजकारणात नवखे असताना जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांशी जुळवून घेताना कशी कसरत झाली हेही शिंदे यांनी सांगितले.

‘आमच्या नादी लागू नका’, शरद पवारांचा सुशिलकुमार शिंदेंना मिश्किल टोला

1973 मध्ये मी सब इन्स्पेक्टरचा राजीनामा देऊन राजकारणात आलो. पण माझे तिकीट कापले गेले. सोलापूर जिल्ह्यात काम करताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला कानमंत्र दिला होता. ते म्हणाले, सुशीलकुमार तुझा जिल्हा मोठा रगेल आहे. दोन प्रचंड मोठे नेते आहेत. तू कुणाच्या नादाला लागू नको, असा सल्ला पवार यांनी मला दिला होता. त्यानुसार मी वागत होतो. करमाळ्यामध्ये नामदेवराव जगताप हे होते. इकडे अकलूजला शंकरराव मोहिते पाटील हे होते. दोघांची मोठी ताकद होती. त्यामुळे मी सकाळी नामदेवराव यांना, तर दुपारी शंकरराव पाटील यांना भेटत होतो. मी तुमचाच आहे म्हणून सांगत होतो. पण दोघेही फार हुशार होते. तू आमचा नाही, तू शरदरावांचा आहे, असे ते मला सांगत, असा किस्सा सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

शरद पवारांनी ‘तो’ निर्णय घेतला नसता, तर ते पंतप्रधान असते; सुशीलकुमार शिंदेंनी मनातली सल बोलून दाखविली !

मी हात जोडून तेथे काम करत होतो. ही शिकवण शरद पवार यांची होती. मी शहरात राहणारा माणूस होतो. कधी झेडपी पाहिली नाही. तालुका माहिती नव्हता. पण नंतर मला सगळे समजले, असे शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

करमाळ्यातून तिकीट मिळविण्यासाठी विजयदादांचे पत्र

1973 ला विजयदादा मोहिते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना मला करमाळ्यातून उमेदवारी देण्याचे शिफारस पत्र देण्यास सांगितले होते. विजयदादा यांनीही मला शिफारस पत्र दिले होते. शरद पवार हे विसरले असतील पण नाही विसरलो नाही, असे शिंदे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube