शरद पवारांनी ‘तो’ निर्णय घेतला नसता, तर ते पंतप्रधान असते; सुशीलकुमार शिंदेंनी मनातली सल बोलून दाखविली !

  • Written By: Published:
शरद पवारांनी ‘तो’ निर्णय घेतला नसता, तर ते पंतप्रधान असते; सुशीलकुमार शिंदेंनी मनातली सल बोलून दाखविली !

Sushilkumar Shinde on Sharad Pawar: अकलूज येथे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांचा वाढदिवसानिमित्त व महाविकास आघाडीच्या खासदारांचा सत्कार सोहळा मोहिते कुटुंबाकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबरोबरचे अनेक किस्से सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले. शरद पवार यांचे पंतप्रधानपद जवळ आले होते. पण ते कसे हुकले याची सलही सुशीलकुमार शिंदे यांनी बोलून दाखविली.

पुण्याला मेट्रो गिफ्ट पण माझं नुकसान झालं.., फडणवीसांच्या उपस्थितीत असं का बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, शरद पवार हे संरक्षणमंत्री होते. त्यावेळी पंतप्रधान नरसिंह राव यांनी सुशीलकुमार शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायची इच्छा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यावेळी पवार हे पाच जनपथवर राहत होते. आम्ही रात्री साडेआठला बसलो. मुख्यमंत्रीपदावर माझे नाव होते. मंत्र्यांची यादी तयारी केली. यादी खिशात घेऊन निघालो. मला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात जायला सांगितले. परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची शपथ घ्या म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी नरसिंह राव यांचा फोन आला. महाराष्ट्राला शरद पवार यांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्रात आले. माझ्या मनात पाल चुकचुकते की त्यावेळी शरद पवार यांनी ‘तो’ निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते. पण कधी-कधी हा नियतीचा खेळ असतो, असेही शिंदे म्हणाले.

पुण्याला मेट्रो गिफ्ट पण माझं नुकसान झालं.., फडणवीसांच्या उपस्थितीत असं का बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी?


शरद पवार यांना काढून टाका म्हणून सही केली

मी आणि विलासराव देशमुख हे पक्के मित्र होतो. मी महाराष्ट्र काँग्रेसचा युवक अध्यक्ष होतो. विलासराव देशमुख यांनी एक कागद आणला. त्या कागदावर मी सही केली आहे. मुख्यमंत्री शरद पवार यांना काढून टाका, असे त्यावर लिहिलेले होते. तेथे मी फसलो होतो. पण शरदराव यांना अखेरपर्यंत ते खरे वाटत नव्हते. सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखा एेवढा हुशार माणूस फसतो कसा? असे शरद पवारांनी वाटत होतो, असा किस्साही शिंदे यांनी दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube