Download App

Karnataka Election Results : काँग्रेसने मुसंडी मारली पण ‘या’ दिग्गज नेत्याच्या भाचीचा दारुण पराभव…

कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारली खरी पण काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकाचा दारुण पराभव झाला आहे. अशोक चव्हाण यांची भाची डॉ. अंजली निंबाळकर खानापूर मतदारसंघातून रिंगणात होत्या. याआधी त्या खानापूर मतदारसंघाच्या विद्यामान आमदार होत्या. त्यांच्या पराभवामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ज्या भाचीसाठी स्वत: अशोक चव्हाण यांनी कर्नाटकात ठाण मांडून ताकद लावली होती. त्याच भाचीला पराभवाला सामोरे जावं लागलं आहेय

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा प्रयोग होऊ देणार नाही, भूमिका म्हणजे पोलीसांच्या गौरवशाली परंपरेला गालबोट

याआधी त्यांनी खानापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. 2014 च्या निवडणुकीत त्यांना पहिल्यांदाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

Karnataka Election Result : बेळगावमध्येही कॉंग्रेसचाच बोलबाला; मतदारांची हातालाच साथ

मात्र, त्यानंतरही त्यांनी मतदारसंघात आपलं काम सुरुच ठेवलं. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा काँग्रेसने संधी दिल्यानंतर निंबाळकर भरघोस मतांनी विजयी झाल्या.

SRH vs LSG : हैदराबादने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा विजयासाठी त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. अशोक चव्हाण स्वत: भाचीच्या प्रचारार्थ कर्नाटकात पाहायला मिळाले होते. मात्र, जोरदार प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन करुनही निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे विठ्ठल हलगेकर यांना 91 हजार मते मिळाली असून विजयी झाले आहेत. तर निंबाळकर यांना फक्त 33 हजार मते मिळाली आहेत.

मात्र, निंबाळकर यांचा या निवडणुकीत पराभव झालाय. त्यांनी खानापूर मतदारसंघातून 33 हजार मते मिळाली आहेत. पराभवानंतर निंबाळकर यांनी ‘आपण पराभव मान्य केला असून जनतेचा कौल स्विकारत’ असल्याचं ट्टिटही केलंय.

आर अशोक यांचा पराभव करून DK Shivakumar सुमारे एक लाख मतांनी विजयी

कर्नाटक विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. ताज्या माहितीनुसार काँग्रेसने 136 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला फक्त 65 जागा मिळाल्या आहेत. तर जेडीएसला 19 जागा मिळाल्या आहेत.

Tags

follow us