Karnataka Election Result : बेळगावमध्येही कॉंग्रेसचाच बोलबाला; मतदारांची हातालाच साथ

Karnataka Election Result : बेळगावमध्येही कॉंग्रेसचाच बोलबाला; मतदारांची हातालाच साथ

Karnataka Election Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Election)मतमोजणी आज पार पडली. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसनं (Congress)विजश्री खेचून आणला आहे. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामध्ये अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्नाटकमध्ये कॉंग्रेसची सत्ता स्थापन होणार आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसनं बेळगावमध्येही जोरदार मुसंडी मारली आहे. बेळगावमधील (Belgaum)18 मतदारसंघांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. यामध्ये सर्वाधिक 11 जागा कॉंग्रेसनं जिंकल्या आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला (Maharashtra Ekikaran Samiti)या भागात एकाही जागेवर विजयी पताका फडकवता आली नाही. त्याचवेळी भाजपने सात जागा जिंकल्या आहेत.

अहिल्यादेवींच्या जन्मोत्सवानिमित्त, शिंदे-फडणवीस चौंडीत

बेळगावमध्ये कोणाचे किती आमदार? :
1 कागवाड विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे राजू कागे यांनी मिळवला आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून भाजपचे श्रीमंत पाटील यांचा पराभव झाला आहे.

2. यमकनमर्डी मतदारसंघातून कॉंग्रेसचे सतीश जारकीहोळ यांचा विजय झाला आहे, तर भाजपचे उमेदवार बरवराज हुंदरी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मारुती नाईक यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

3. खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी आपला झेंडा फडकवला आहे. त्या ठिकाणी कॉंग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर आणि मुरलीधर पाटील यांना धूळ चारली आहे.

4. निपाणी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार शशिकला जोल्ले यांनी विजय मिळवला आहे, तर राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार जयराम मिरजकर यांचाही पराभव झाला आहे.

5. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विजश्री खेचून आणला आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे नागेश मन्नोळकर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर.एम चौगुले यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

6. बेळगाव दक्षिण मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अभय पाटील यांनी विजय मिळवत महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडूसकर यांचा पराभव केला आहे.

7.बेळगाव उत्तरमधून कॉंग्रेसचे राजू शेठ यांचा विजय तर भाजपचे डॉ. रवी पाटील आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे अमर येळ्ळूरकर यांचा पराभव झाला आहे.

8. गोकाक मतदारसंघात भाजपचे रमेश जारकीहोळ यांचा विजय तर कॉंग्रेसचे मानतेश कडाडी यांचा पराभव झाला आहे.

9. अथणी मतदारसंघातून (माजी उपमुख्यमंत्री) कॉंग्रेसचे लक्ष्मण सवदी यांनी विजयी पताका फडकावली आहे, तर भाजपचे महेश कुमठोळे यांचा पराभव झाला आहे.

10. रायबाग मतदारसंघातून भाजपचे दुर्योधन ऐहोळ यांचा विजय तर कॉंग्रेसचे महावीर मोहिते यांचा पराभव झाला आहे.

11. हुक्केरीमध्ये भाजपचे निखिल काती यांचा विजय झाला असून कॉंग्रेसचे ए.बी. पाटील यांचा पराभव झाला आहे.

12. कित्तूरमध्ये कॉंग्रेसचे बाबासाहेब पाटील यांचा विजय तर भाजपचे महांतेश दोडगौडर यांचा पराभव झाला आहे.

13. सौदत्ती मतदारसंघातून कॉंग्रेसचे विश्वास वैद्य यांचा विजय झाला आहे, तर भाजपच्या रत्ना मामनी यांचा पराभव झाला आहे.

14. आरभावी मतदारसंघातून भाजपचे भालचंद्र जारकीहोळ यांचा विजय तर अपक्ष उमेदवार भिमप्पा गुंडप्पा गदद यांच्यासह कॉंग्रेसचे अरविंद दळवाई यांचा यांचा पराभव झाला आहे.

15. कुडचीमधून कॉंग्रेसचे महेंद्र तम्मणवर विजयी तर भाजपचे पी राजीव यांचा पराभव झाला आहे.

16. चिक्कोडी-सदलगामधून कॉंग्रेसचे गणेश हुक्केरी यांचा विजय झाला असून भाजपचे रमेश कत्ती यांचा पराभव झाला आहे.

17. बेलहोंगलमधून कॉंग्रेसचे महातेश कौजलगी विजयी झाले आहेत. तर भाजपचे जगदीश मेटगुड यांचा पराभव झाला आहे.

18. रामदुर्गमधून कॉंग्रेसचे अशोक पट्टण यांचा विजय झाला आहे, तर भाजपचे चिक्करेवण्णा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube