कर्नाटक निवडणूक : राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. या निवडणुकीसाठी पहिल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. यासोबतच राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची नावेही जाहीर केले असून विशेष म्हणजे या यादीत अजित पवार यांचं नाव नसल्याने राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली आहे. खारघर येथील मृत्यूला राज्य सरकार जबाबदार; मुंबईतून पवारांचा हल्लाबोल यामध्ये बेळगावमधून उत्तम पाटील, बिजापूर […]

Ajit Pawar

Ajit Pawar

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. या निवडणुकीसाठी पहिल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. यासोबतच राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची नावेही जाहीर केले असून विशेष म्हणजे या यादीत अजित पवार यांचं नाव नसल्याने राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली आहे.

खारघर येथील मृत्यूला राज्य सरकार जबाबदार; मुंबईतून पवारांचा हल्लाबोल

यामध्ये बेळगावमधून उत्तम पाटील, बिजापूर मतदारसंघातून मन्सूर बिलागी, बागेवाडी मतदारसंघात जमीर इनामदार, नागस्थान मतदारसंघातून कुलाप्पा चव्हाण, येलबुर्गा मतदारसंघातून हरी आर. तसेच राणेबेन्नूर मतदारसंघातून आर. शंकर, विजयानगर मतदारसंघात सुगाना के, कोडोगो मतदारसंघात आय. एम. मसूद फौजदार, आणि नरसिम्हाराजा मतदारसंघातून रहेना बानो यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भर गर्दीत चार राऊंड फायर; साकेत कोर्टातील गोळीबाराचा लाईव्ह व्हिडीओ

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत.आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 20 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे.

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकूण तीन पक्ष मैदानात उतरले आहेत. यामध्ये भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) आपापल्या उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. प्रत्येक यादीसोबतच पक्षातल्या नेत्यांची नाराजीही वाढत चालली आहे, भाजपने अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले, त्यानंतर पक्षपरिवर्तनाची प्रक्रिया सुरूच आहे.

Exit mobile version