Download App

कावेरी पाणी प्रश्न पेटला: बंगळुरूमध्ये विमानसेवा विस्कळीत, 44 उड्डाणे रद्द

Karnataka bandh : कावेरी नदीचे (Cauvery Issue) पाणी तामिळनाडूला (Tamil Nadu) देण्याच्या विरोधात कर्नाटकात राज्यव्यापी (Karnataka bandh) बंद पुकारण्यात आला आहे. कन्नड संघटनेच्या ‘कन्नड ओक्कूटा’ने हा बंद पुकारला होता. राज्यातही बंदचा परिणाम दिसून येत आहे. आज बंगळुरू (Bangalore) आंतरराष्ट्रीय विमानतळावरून किमान 44 उड्डाणे रद्द करण्यात आली. बंदमुळे अनेक शहरांतील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

ऑपरेशनल कारणांमुळे उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती प्रवाशांना देण्यात आली आहे, विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, विमान उड्डाणे रद्द करण्यामागे कर्नाटक बंदचा हात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कर्नाटक बंदला डोळ्यासमोर ठेवून बहुतांश प्रवाशांनी स्वतःहून तिकिटे रद्द केली होती. बंदमुळे प्रवाशांना बंगळुरू विमानतळावर पोहोचण्यात अडचण येत होत्या.

समर्थक कार्यकर्त्यांचा विमानतळावर प्रवेश
पाच कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे झेंडे घेऊन बंगळुरू विमानतळावर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या समर्थक कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यापूर्वीच त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या पाच जणांकडून तिकिटे सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. ही सर्व तिकिटे बुक झाली होती. ही तिकिटे दाखवून या समर्थक कार्यकर्त्यांनी विमानतळावर घुसण्याचा आणि नंतर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते करण्याआधीच त्यांना पकडण्यात आले.

MP Election 2023 : ज्योतिरादित्य सिंधियांचे ‘विमान’ पुन्हा मध्य प्रदेशात ? आत्याच्या मतदारसंघातून तिकीट

अनेक जिल्ह्यात कलम 144 लागू
कर्नाटकात पुकारण्यात आलेल्या बंदला बंगळुरू आणि राज्यातील दक्षिण भागात मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळेच या भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. बेंगळुरू शहर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, रामनगरा आणि हसन जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे. या शहरांमधील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. कावेरी नदीच्या पाण्याच्या वादामुळे मंगळवारी बंगळुरू बंद राहिले.

मोठी बातमी : बारामती ॲग्रोवर 6 ऑक्टोबरपर्यंत कारवाई करू नका; HC चा रोहित पवारांना दिलासा

बंदला ‘कर्नाटक फिल्म एक्झिबिटर्स असोसिएशन’चाही पाठिंबा मिळाला आहे. कर्नाटकात संध्याकाळचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या बंदचा परिणाम बंगळुरूमधील आयटी क्षेत्रावरही दिसून आला आहे. अनेक कंपन्यांनी घरून काम करण्यास सांगितले आहे. या बंदला ‘ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स युनियन’ आणि ‘ओला उबर ड्रायव्हर्स अँड ओनर्स असोसिएशन’चाही पाठिंबा मिळाला आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज