Download App

भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; राहुल गांधींना त्याचवेळी कानशिलात मारायला हवी होती

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल भाजपच्या आमदाराने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता देशभरात गदारोळ सुरू झाला आहे.

BJP MLA Bharat Shetty Controversial statement : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल कर्नाटकचे भाजप आमदार भरत शेट्टी यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या कथित हिंदुविरोधी वक्तव्यासाठी त्यांना संसदेत कोंडून कानशिलात मारायला हवी होती, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. (BJP MLA) त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Rahul Gandhi) जर राहुल गांधी मंगळुरू शहरात आले तर आम्ही त्यांच्यासाठी अशीच व्यवस्था करू असंही ते म्हणाले आहेत.

प्रयत्न केले पण, सरकारसाठी नंबर मिळाला नाही; शरद पवारांनी घडलं तेच सांगितलं

संसदेच्या आत जोरदार कानशिलात मारल्यानंतर विरोधी पक्षनेते बरे होतील असंही भरत शेट्टी यावेळी म्हणाले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हातात भगवान शंकराचे चित्र होतं. त्यांना माहित नाही की भगवान शंकराने तिसरा डोळा उघडला तर ते राख होतील. त्यांनी हिंदुविरोधी धोरण स्वीकारलं आहे. यावरून ते एक वेडा माणूस असल्याचं स्पष्ट होतं असंही ते म्हणाले आहेत. याचवेळी आमदार शेट्टींनी आरोपी केला की, ‘राहुल गांधी केरळला गेल्यावर धर्मनिरपेक्ष व्यक्ती बनतात आणि तामिळनाडूत ते नास्तिक असतात. जेव्हा ते गुजरातमध्ये येतात तेव्हा भगवान शिवाचे निस्सीम भक्त असतात असही ते म्हणाले आहेत.’

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना आमदार शेट्टी पुढे म्हणाले की, ‘लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत केवळ 99 जागा मिळाल्यानंतर, राहुल गांधींना काहीतरी मोठं केल्यासारखं वाटत आहे. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा जन्म हिंदू समाजात झाला. जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही शस्त्रे बाहेर काढू. बदला कसा घ्यायचा हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. संसदेत जोरदार कानशिलात मारल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी बरे होतील असं वक्तव्य त्यांनी केलंय.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी केले राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले, ते हिंदू धर्माविषयी चुकीचं बोललेच नाहीत

कर्नाटकचे भाजप आमदार भरत शेट्टी यांनी दावा केला की, “हिंदू धर्म आणि संस्थांचे रक्षण करणं हे भाजपचे कर्तव्य आहे. हिंदू आणि हिंदुत्व वेगळे असल्याचं काँग्रेसने सांगायला सुरुवात केली आहे. अशा नेत्यांमुळे हिंदूंना भविष्यात गंभीर संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ते अशी परिस्थिती निर्माण करतील की हिंदू घराबाहेर पडू शकणार नाहीत असंही ते म्हणाले आहेत.

follow us