Download App

Crime : धक्कादायक! घरात घुसून आईसह तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या

  • Written By: Last Updated:

Karnataka Crime : कर्नाटकमध्ये एक धक्कादायक गुन्हेगारीची (Karnataka Crime) घटना समोर आली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. कर्नाकातील उडुपी जिल्ह्यामध्ये केमन्नू भागात नेझर गावामध्ये रविवारी ही घटना घडली. या हल्लेखोरांनी एकच कुटुंबातील चार जणांची चाकूने भोकसून हत्या केली. यामध्ये आईसह तीन मुलांचा समावेश होता. तसेच आणखी एक महिला देखील जखमी झाली आहे.

Praveen Tarde: पत्नीच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडेची खास पोस्ट; म्हणाला, ‘तुझ्या ब्रम्हानंदी…’

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणी तपास सुरू केला आहे. या हल्लेखोरांनी मास्क घातलेले होते. तर जबरदस्तीने ते या महिलेच्या घरात घुसले होते. हसीना असं या मृत महिलेचं नाव आहे. ती 46 वर्षांची होती. तर त्यांच्या अनुक्रमे 23,21 आणि 12 वर्षांच्या तीन मुलांची देखील या हल्लेखोरांनी हत्या केली. तसेच आणखी एक महिला देखील जखमी झाली आहे. ती त्यांची सासू आहे.

Israel Hamas War : गाझामध्ये मृत्यूतांडव सुरूच WHO कडून युद्धविरामाचं आवाहन, पण इस्त्रायल

दरम्यान अद्याप या घटनेमागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र वैयक्तिक भांडणातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे. तसेच चोरीच्या उद्देशाने देखील ही हत्या झालेली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण घरातील कोणत्याही वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे दरोड्याच्या कारणामुळे ही हत्या झालेली नाही. असं पोलिसांनी म्हटलं आहे.

या महिलेता पती आखाती देशात काम करतो. त्यामुळे ही महिला तिचे तीन मुलं आणि सासू सोबत कर्नाकातील उडुपी जिल्ह्यामध्ये केमन्नू भागात नेझर या गावामध्ये राहत होती. मात्र या घटनेसह परिसरासह जिल्हा हादरला आहे.

Tags

follow us