Israel Hamas War : गाझामध्ये मृत्यूतांडव सुरूच; WHO कडून युद्धविरामाचं आवाहन, पण इस्त्रायल…

Israel Hamas War : गाझामध्ये मृत्यूतांडव सुरूच; WHO कडून युद्धविरामाचं आवाहन, पण इस्त्रायल…

Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरुच आहे. आता तर युद्ध जास्तच भडकत चालले आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीत (Gaza City) जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. त्यानंतर आता इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे गाझामधील रूग्णालयांमध्ये मृत्यूचं तांडवं मांडलं आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने इस्त्रायला युद्धविरामाचं आवाहन केलं आहे.

शरद पवार हे ‘ओबीसी’? व्हायरल दाखल्याने खळबळ; रोहित पवार यांचा भाजपवर गंभीर आरोप

एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसूस यांनी एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी इस्त्रायला युद्धविरामाचं आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं की, ‘जागतिक आरोग्य संघटनेने अल शिफा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तेथील परिस्थिती भयंकर आहे. धोकादायक आहे. तेथे वीज, पाणी आणि इंटरनेट देखील बंद करण्यात आलेलं आहे. मृतांची संख्या वाढली आहे. रूग्णालय सेवा देऊ शकत नाही.’

त्यामुळे सुरक्षित रूग्णालयात जर एवढे मृत्यू होतं असतील जग शांत बसू शकत नाही. त्यामुळे तात्काळ युद्धविराम हवा आहे. असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने इस्त्रायला युद्धविरामाचं केलं आहे. मात्र जोपर्यंत हमासच्या ताब्यात असलेले ओलिस सोडले जात नाही तो पर्यंत युद्ध थांबणार नाही. असा पवित्रा इस्त्रायलने घेतला आहे.

Jhimma 2 : सप्तरंगांची उधळण करणारा ‘झिम्मा 2’ चा धमाकेदार ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

दुसरीकडे मात्र अमेरिकेसह अनेक राष्ट्रांकडून इस्त्रायलवर दबाव आणला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत भारताने इस्त्रायलची बाजू घेतली होती. मात्र, संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर कब्जा केल्याचा निषेध करणारा ठराव मांडला होता. त्याला भारताने पाठिंबा दिला आहे. याशिवाय, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणीही भारताने केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube