Download App

CBI Director : प्रवीण सूद यांची सीबीआयच्या नवीन संचालकपदी नियुक्ती

CBI Director : कर्नाटकचे डीजीपी (Karnataka DGP)प्रवीण सूद (Praveen Sood)यांची केंद्रीय अन्वेशन विभागाच्या (CBI) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद हे यापूर्वी कर्नाटकचे पोलीस प्रमुखही राहिले आहेत. प्रवीण सूद हे सध्याचे सीबीआय संचालक सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal)यांची जागा घेणार आहेत. पीएम मोदींच्या (PM Modi) अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या समितीमध्ये पंतप्रधान मोदींशिवाय सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड(Chief Justice DY Chandrachud), लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचाही समावेश होता.

डी. के. शिवकुमार यांचा सिद्धरामय्यांना पाठिंबा; सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार?

समितीने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडली होती. त्यानंतर ही नावं मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे पाठवण्यात आली. या समितीने सीबीआयच्या नव्या अध्यक्षाचे नाव निश्चित केले. कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद, डीजी फायर सर्व्हिसेस, सिव्हिल डिफेन्स अॅण्ड होमगार्ड ताज हसन आणि मध्य प्रदेशचे डीजीपी सुधीर कुमार सक्सेना अशी तीन नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती.

प्रवीण सूद हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्याचे सीबीआय संचालक सुबोध कुमार हे मुंबई पोलीस आयुक्त होते. त्यांनी सीबीआय संचालक पदाचा पदभार 26 मे 2021 रोजी स्वीकारला होता. याचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रवीण सूद पदभार स्वीकारणार आहेत.

प्रवीण सूद अशावेळी सीबीआय संचालक म्हणून पदभार स्वीकारत आहेत. जेव्हा एजन्सी अनेक संवेदनशील प्रकरणांची चौकशी करत आहेत. यामध्ये पेगासस स्पायवेअर, कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा आदी प्रकरणांचा समावेश आहे.

Tags

follow us