Karnataka DGP Viral Video : कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात कर्नाटका सरकाने मोठी कारवाई करत कर्नाटकचे पोलिस महासंचालक के. रामचंद्र राव यांना निलंबित केले आहे. त्यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
रामचंद्र राव यांचे वर्तन नियमांचे उल्लंघन करते असं कर्नाटका सरकारकडून (Karnataka Government) सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे हे व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचे के. रामचंद्र राव (K. Ramachandra Rao) यांनी म्हटले आहे. प्रतिमा मलिन करण्याचे आरोप करत त्यांनी या व्हिडिओची फॉरेन्सिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये के. रामचंद्र राव (Karnataka DGP Viral Video) विविध महिलांसोबत कार्यलयात अश्लील कृत्ये करताना दिसत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. तर आता या प्रकरणात कर्नाटका सरकारने मोठी कारवाई करत के. रामचंद्र राव (Karnataka DGP Ramachandra Rao) यांना निलंबित केले आहे. आम्ही त्याची चौकशी करू. मला आज सकाळीच याबद्दल माहिती मिळाली. आम्ही त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करू. कोणीही कायद्यापेक्षा वर नाही, पोलिस अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी असं कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले होते.
Sleaze tapes row: DGP Ramachandra Rao suspended. The Karnataka Govt has issued an order suspending him citing that he acted in an obscene manner which is unbecoming of a Govt Servant & causing embarrassment to the Govt. He service tenure was to end in a couple of months. https://t.co/XvFoh8XK99 pic.twitter.com/lfJuDuU36Y
— Deepak Bopanna (@dpkBopanna) January 20, 2026
सरकारी आदेशात काय म्हटले आहे?
डीजीपींच्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, “राव यांनी अश्लील वर्तन केले जे सरकारी कर्मचाऱ्याला शोभत नाही आणि त्यामुळे सरकारलाही लाजिरवाणे वाटले आहे. राज्य सरकारला प्रथमदर्शनी खात्री आहे की चौकशी होईपर्यंत डीजीपी डॉ. के. रामचंद्र राव यांना तात्काळ निलंबित करणे आवश्यक आहे.” आदेशानुसार, निलंबनाच्या काळात, राव राज्य सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू शकत नाहीत.
मुंबई महापौर पदासाठी तडजोड करु नका; दिल्ली नेतृत्वाचे भाजप नेत्यांना आदेश
