Download App

Karnataka Election : काँग्रेसमुक्त भारत म्हणून चिडवायचे, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला : खर्गे

Karnataka Elections Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ( Karnataka Elections) 10 मे ला मतदान घेण्यात आलं. त्यानंतर निकाल आज (13 मे) जाहीर झाले होणार आहेत. दरम्यान यावेळी कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? हे आज समोर येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाली आहे. तर दुपारी दोन वाजेपर्यंत हे कौल हाती येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

 

 

LIVE NEWS & UPDATES

  • 13 May 2023 08:00 PM (IST)

    काँग्रेसमुक्त भारत म्हणून चिडवायचे, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला : खर्गे

    या विजयाने संपूर्ण देशात एक नवी उर्जा निर्माण केली आहे. भाजपा 'काँग्रेसमुक्त भारत' करू असं म्हणत आम्हाला चिडवत होता. मात्र, सत्य हे आहे की, आता भाजपामुक्त दक्षिण भारत झाला आहे असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

  • 13 May 2023 05:52 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी केले काँग्रेसचे अभिनंदन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे मी कौतुक करतो असेही ते म्हणाले आहे.

  • 13 May 2023 02:58 PM (IST)

    आम्ही गरीबांच्या मुद्द्यांवर लढलो; कर्नाटक निकालावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

    मी सर्वात आधी कर्नाटकच्या जनतेला, काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक निवडणुकीत एका बाजूला भांडवलशाहीची ताकद होती आणि दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. या गरीब जनतेच्या शक्तीने भांडवलशाहीचा पराभव केला. हेच प्रत्येक राज्यात होईल. काँग्रेस कर्नाटकात गरीबांबरोबर उभा राहिला. आम्ही गरीबांच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो.

    – राहुल गांधी (काँग्रेस नेते)

     

  • 13 May 2023 02:50 PM (IST)

    शरद पवारांचे भाजपला खडेबोल!

    शरद पवार यांनी आज लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निकालावरुन भाजपला सुनावले आहे. कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल याची आम्हाला खात्री होती. केंद्र सरकार व भाजपकडून ज्या राज्यात त्यांचे सरकार नाही तेथील आमदार फोडून ते राज्य ताब्यात घ्यायचे असा कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठीच सत्तेचा वापर करणे हे सूत्र त्यांनी वापरले. कर्नाटकातही आधी त्यांनी हेच केलं. येथील लोकनियुक्त सरकार त्यांनी पाडले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी जे केलं तेच तिथे झालं. मध्य प्रदेशातही त्यांनी तेच केलं. गोव्यात बहुमत नसताना आमदार फोडून ते राज्य हातात घेतलं. दुसरीकडे फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे लोकांना पसंत नाही याचं उत्तम उदाहरण आपल्याला कर्नाटकच्या निवडणुकीतून मिळालं आहे.

  • 13 May 2023 02:40 PM (IST)

    हे निकाल देशभरात मोदी है तो मुमकिन हैं , असं म्हणणाऱ्यांसाठी चपराक आहे- सुषमा अंधारे

    - हे निकाल देशभरात मोदी है तो मुमकिन हैं , असं म्हणणाऱ्यांसाठी चपराक आहे.
    - मागील नऊ वर्षात मोदींनी प्रचंड नकारात्मकतेच हेट पॉलिटिक्स पसरवलं आहे. त्याला लोक कंटाळलेले आहे.
    - बेरोजगारी, महागाई याचा ग्रोथ रेट पाहता कर्नाटकमधील जनता सुजाण आहे.
    - दक्षिण भारतीय प्रगत विचारधारेचे आहे. आणि या येणाऱ्या निकालाचा फायदा आणि नवी ऊर्जा येणाऱ्या काळात महारष्ट्रात पाहायला मिळेल.- कर्नाटक निकालावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

  • 13 May 2023 02:31 PM (IST)

    भाजपासाठी विजय आणि पराभव नवा नाही

    भाजपासाठी विजय आणि पराभव नवा नाही. भाजपा कार्यकर्त्यांनी या निकालानंतर गोंधळून जाण्याची गरज नाही. पक्षाच्या पराभवावर आम्ही आत्मचिंतन करू. मी आदरपूर्वक हा पराभव स्वीकारतो.

    – बी. एस. येडीयुरप्पा (भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री, कर्नाटक)

  • 13 May 2023 01:45 PM (IST)

    डीके शिवकुमार आणि सिद्धारमय्या यांना दिल्लीला बोलावलं

    कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यामुळं कॉंग्रेसच्या आमदारांना आजच बंगळुरुमध्ये बोलवलं आहे. त्याचवेळी कर्नाकटमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी घडत असतानाच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि नेते सिद्धरामय्यांना हायकमांडने आजच दिल्लीला बोलवले आहे. त्यामुळं कर्नाटकचा आगामी मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय उद्याच होण्याची शक्यता आहे.

  • 13 May 2023 01:12 PM (IST)

    कर्नाटकात भाजपकडून पराभव मान्य?

    कर्नाटकमध्ये काँग्रेसची विजयी घौडदौड सुरू असून निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्येही काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. तर आता भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. की, 'पंतप्रधान आणि भाजप कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न करूनही आम्ही विजयी होऊ शकलो नाही. तर पूर्ण निकाल आल्यावर आम्ही तपशीलवार विश्लेषण करू'

  • 13 May 2023 12:28 PM (IST)

    माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू निखिल कुमारस्वामी पिछाडीवर

    JD(S) नेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू निखिल कुमारस्वामी सध्या रामानगरममधून पिछाडीवर आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, निखिल कुमारस्वामी यांना रामनगरम जागेवरून 47,891 मते मिळाली आहेत, तर काँग्रेसचे इक्बाल हुसेन निखिलच्या मागे आहेत. हुसेन यांना 61,353 मते मिळाली असून, भाजपचे गौतम मारिलिंग गौडा यांना 8701 मते मिळाली आहेत.

  • 13 May 2023 11:40 AM (IST)

    कॉंग्रेस पक्ष कार्यालयात आतिशबाजी करत जल्लोष

    कर्नाटकमध्ये काँग्रेसची विजयी घौडदौड सुरू असून निवडणूक आयोगाच्या ट्रेंडमध्येही काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष कार्यालयात आतिशबाजी आणि गुलाल उधळत करत जल्लोष करण्यात आलाय.

Tags

follow us