Download App

Karnataka Election Results: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा राजीनामा

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत (ThawarChand Gehlot) यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मी राज्यपालांकडे वेळ मागितला आणि राजीनामा दिला. राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. असे भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.

कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चमकदार कामगिरी करत 136 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला केवळ 62 जागा मिळाल्या. त्याचवेळी जेडीएसला 21 तर इतरांना चार जागा मिळाल्या.

दरम्यान, कर्नाटकमध्ये शनिवारी (13 मे) काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव करत स्पष्ट बहुमत मिळविले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे विजयानंतर म्हणाले की, हा भाजपमुक्त दक्षिण भारत आहे. आपण युद्ध जिंकले आहे, परंतु आपल्याला युद्ध जिंकायचे आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून काँग्रेसचे अभिनंदन केले आहे.

कर्नाटक विधानसभेच्या सर्व 224 जागांसाठी 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले. याचे निकाल आज जाहीर आले आहे. सत्तास्थापनेसाठी राजकीय पक्षांना बहुमतासाठी 113 ही मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. दरम्यान या निवडणुकीत विक्रमी 73.19 टक्के मतदान झाले. काँग्रेसने 42.9 टक्के मतांसह 136 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 36 टक्के मतांसह केवळ 65 जागा जिंकता आल्या. जनता दलने 13 टक्के मतांसह 19 जागा जिंकल्या आहेत. तर इतर 04 जागा मिळाल्या आहेत.

Tags

follow us