Download App

Karnataka Elections : जिथून मोदींना चिथावले तिथेच फोडणार प्रचाराचा नारळ; राहुल गांधींचा भन्नाट प्लॅन

Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (Karnataka Elections) घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. यंदा काँग्रेस (Congress) आणि भाजपात (BJP) लढत होईल असे मानले जात आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांत शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

कर्नाटकात सत्ता कायम राखण्यासाठी भाजप पूर्ण ताकद लावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) प्रचारात उतरणार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) जोरदार प्रचार करणार आहेत. विशेष म्हणजे, राहुल गांधी त्याच ठिकाणावरून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत जेथून त्यांनी 2019 मध्ये पीएम मोदींबाबत वक्तव्य केले होते.

56 इंचाची छाती अन् 303 खासदार असतानाही मोदी का घाबरतात ? कॉंग्रेस नेत्याचा सवाल

निवडणूक आयोगाने बुधवारी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात एकूण 224 विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्या राज्यात भाजप सत्तेत आहे. राज्यात एकूण 5 कोटी 21 लाख 579 मतदार आहेत.

राज्यात सन 2018 मध्ये निवडणुकांनंतर जनता दल (एस)-काँग्रेस यांचे सरकार पडल्यानंतर जुलै 2019 मध्ये भाजप सत्तेत आला होता. जनता दल आणि काँग्रेसच्य अनेक बंडखोर आमदारांचा पाठिंबा घेत भाजपने सत्ता स्थापन केली. त्यानंतर हे बंडखोर आमदार भाजपात आले आणि पोटनिवडणुकीत विजयी झाले. सध्या विधानसभेत भाजपाचे 121 आमदार आहेत.

नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्याने दिला चार बछड्यांना जन्म, पाहा व्हिडिओ

काँग्रेसचे 70 आणि जनता दलाचे (एस) 30 आमदार आहेत. भाजपाने त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री बदलला. बी. एस. येदियुरप्पा यांनी जुलै 2021 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याजागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री करण्यात आले. यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. काही वादही झाले.

त्यानंतर आता निवडणुका जाहीर झाला आहे. राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचे भाजपाचे उद्दीष्ट आहे.  तर भाजपला सत्तेतून बाहेर खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे. मतदानाला अजून महिनाभराचा अवकाश आहे. त्यामुळे काँग्रेस, भाजपसह अन्य पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.

Tags

follow us