56 इंचाची छाती अन् 303 खासदार असतानाही मोदी का घाबरतात ? कॉंग्रेस नेत्याचा सवाल

56 इंचाची छाती अन् 303 खासदार असतानाही मोदी का घाबरतात ? कॉंग्रेस नेत्याचा सवाल

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कॉंग्रेसकडून संसदेत अदानी उद्योगसमुहावरून केंद्र सरकारला घेरण्यात येत आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांनी देखील अदानी उद्योगसमुहात 20 हजार कोटी रूपायांची गुंतवणूक कोणाची आहे? त्यात सहभाग असणारा चीनी नागरिक कोण आहे? असा सवाल इपस्थइत करत ही माहिती जनतेसमोर आली पाहिजे. यासाठी या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करुन चौकशी करा अशी मागणी केली होती.

त्यावर आता काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी देखील सरकारवर याप्रकरणवरून टीका केली आहे. पण मोदी सरकार या चौकशीला का घाबरत आहे? असा प्रश्न खेरा यांनी विचारला आहे. ते अदानी उद्योगसमुहासंदर्भातील घोटाळ्याच्या मुद्द्यावर आज कॉंग्रेसने देशभरात 35 ठिकाणी डेमोक्रसी डिस्क्वालीफाईड पत्रकार परिषदा घेतल्या. तेव्हा मुंबईतील गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना पवन खेरा यांनी ही टीका केली.

पवन खेरा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात जातात तेव्हा त्यांच्यासोबत अदानी असातात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोदींनीच अदानींना कंत्राट आणि एसबीआयकडून कर्ज दिले. तसेच श्रीलंकेतील ऊर्जा क्षेत्राचे कंत्राट असो, बांग्लादेशातील वीज पुरवठ्याचे कंत्राट, एलआयसीच्या 33 कोटी गुंतवणूकदारांचा पैसा अदानीच्या कंपनीत गुंतवण्यास भाग पाडले. असे आरोप यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी केला आहे.

Rahul Gandhi Press Conference Highlight : काँग्रेस नेते राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख १० मुद्दे

याप्रकरणी प्रश्न विचारले असता ते संसदेच्या कामकाजातून काढून टाकले जातात. राहुल गांधींना अदानींबद्दल प्रश्र विचारातात 2 वर्षांची शिक्षा, खासदारकी रद्द, घर देखील सोडायची नोटीस पाठवली आहे. राहुल गांधी मोदींना प्रश्न विचारायला घाबरत नसतील तर अदानींच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करुन चौकशी करण्यासाठी 56 इंचाची छाती व 303 खासदार असतानाही मोदी का घाबरत? आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube