Rahul Gandhi Press Conference Highlight : काँग्रेस नेते राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख १० मुद्दे
Rahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत काही प्रश्न विचारले आहे. तसेच देशात रोज लोकशाहीवर आक्रमण होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हणाले. अदानींच्या कंपनीतील गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये नेमके कोणाचे ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. पाहुयात राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे 10 मुद्दे
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषेदेतील प्रमुख 10 मुद्दे
1) देशातील लोकशाहीवर रोज आक्रमण होत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी केले आहे.
2) संसदेत माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. मला कोणाही घाबरवू शकत नाही.
3) अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध काय आहे ? असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधींनी घेतली पत्रकाराची फिरकी; म्हणाले, देखो हवा निकल गई..
4) अदानी हे भ्रष्ट आहेत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना का वाचवत आहेत ? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. अदानी भ्रष्ट आहेत हे जनतेला माहित असल्याचेही त्यांनी म्हणाले.
5) अदानींवर झालेले आक्रमण हे देशावर झालेले आक्रमण असल्याचे भाजपच्या लोकांना वाटत आहे. त्यांना देश अदानी आणि अदानी देश असल्याचे वाटत असल्याचे दिसून येत आहे.
6) खासदारकी रद्द केली तरी मी काय घाबरणार नाही. माझं नाव गांधी आहे. मी कोणाची माफी मागणार नाही. गांधी कधी माफी मागत नाही. माफी मागायला मी सावरकर नाही असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
Sanjay Gandhi : राहुल गांधींच्या काकांनाही झाली होती २ वर्षांची शिक्षा, हा चित्रपट ठरलं होतं ‘कारण’
7) सवाल करणे मी सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अदानींबरोबर कोणते संबंध आहेत आणि ते 20 हजार कोटी कोणाचे आहेत हा प्रश्न मी विचारत राहणार असल्याचे ते म्हणाले.
8) संसदेत अदानी आणि मोदींचा काय संबंध विचारल्यानंतर भाजपने माझ्याविरोधात ओरड सुरु केला मोदी आणि अदानी यांचं नातं नवीन नाही. ते गुजरातचे पंतप्रधान असल्यापासून त्यांचे मोदींशी संबंध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितल.
9) मला धमकावून,जेलमध्ये टाकून, माझी खासदारकी रद्द करुन मला तुम्ही थांबवू शकत नाहीत. मी देशातील लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहणार असल्याचे म्हणाले.
10) मी खरे आणि सत्य बोलत आहे. ते माझ्या रक्तात असल्याचे राहुल गांधी म्हणाले.