Download App

Karnataka Elections : वाढला मतदानाचा टक्का, कुणाला धक्का? भाजप-काँग्रेसमध्ये घमासान

Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Elections) निकाल उद्या (13 मे) जाहीर होणार आहेत. यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा इतिहास पाहिला तर सत्ताधारी पक्षांना धक्का बसला आहे. आताही तसेच होणार का, भाजप सत्तेतून बेदखल होईल का, जेडीएस किंगमेकर ठरेल का, काँग्रेसचा वनवास संपेल का, सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेस चमत्कार करणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

राज्यातील 224 जागांसाठी एकूण 2 हजार 615 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. यावेळ मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकात 73.19 टक्के मतदान झाले.

मागील 2018 च्या मतदानाच्या तुलनेत यावेळचे मतदान एक टक्क्याने जास्त आहे. बंगळुरू ग्रामीणमध्ये 85 टक्के, जुने मैसुरूमध्ये 84 टक्के मतदान झाले. आयोगाने सांगितले, की मेलकोट विधानसभा जागेसाठी सर्वाधिक 91 टक्के मतदान झाले. बोमनहल्लीमध्ये सर्वात कमी 47.4 टक्के मतदान झाले.

आगामी निवडणुकांसाठी नितीश कुमारांनी सांगितला फॉर्म्युला

या वाढलेल्या मतदानामुळे राजकीय पक्षांची धाकधूक वाढली आहे. कुणाचे सरकार येणार हा प्रश्न आहे. निवडणुकीच्या आधी मतदानानंतर जे काही सर्व्हे आले आहेत त्यामध्ये काँग्रेस चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे.जेडीएसलाही चांगले यश मिळताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीची कामगिरी मात्र निराशाजनक राहिल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी असे पक्षही नशीब आजमावत आहे. या पक्षाच्या उमेदवारांना किती यश मिळेल हे उद्याच कळेल. मात्र, येथे खरी लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच आहे. यावेळी काँग्रेसने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. निवडणुकीच्या नियोजनातही फारसा गोंधळ दिसला नाही. तिकीट वाटपात आणि त्यानंतर नाराजी बंडखोरी उफाळून येणार नाही याची काळजी घेण्यात आली. भाजपातील नाराजांना तिकीटे देण्यात आली.

भाजपनं हेरलं, केला तुफान प्रचार 

तर दुसरीकडे भाजपने मात्र अनेक विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे नाराजी वाढली. बंडखोरीही झाली. तसेच निवडणुकीआधी घेतलेल्या काही निर्णयांमुळेही पक्षाची वाटचाल कठीण झाल्याचे बोलले जात आहे. या गोष्टीचा अंदाज आल्याने भाजपाने जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी तुफान प्रचार केला. भव्य रोड शो, रॅलीला लोकांचीही गर्दी झाली होती. आता या गर्दीचे मतात किती रुपांतर झाले, हे उद्या मतमोजणीनंतरच कळणार आहे.

Karnataka Exit Poll : कर्नाटकात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष पण…

Tags

follow us