Karnataka Exit Poll : कर्नाटकात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष पण…

Karnataka Exit Poll : कर्नाटकात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष पण…

Karnataka Assembly Elcetion : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलंय. 224 जागांसाठी मतदान पार पडलं असून मतदानानंतर कर्नाटकात कोणत्या पक्षाची सत्ता येणार? याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकात सत्तेत असलेल्या भाजपला मागे टाकत काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला 100 ते 112 जागा मिळणार असल्याचा एक्झिट पोल टिव्ही9 कन्नड, इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया, जन की बात, मॅट्रिझ, सी वोटर संस्थेने दिला आहे. तर भाजपला 83 ते 95 जागा मिळणार असल्याचंही समोर आलं आहे. या एक्झिट पोलनंतर कर्नाटकात आता काँग्रेस सत्तेत येणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Shinde Vs Thackeray : सत्तासंघर्षात आत्तापर्यंत काय-काय घडले? जाणून घ्या एका क्लिकवर

गेल्या महिन्यापासून कर्नाटकात निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. अखेर ही रणधुमाळी आज थांबली आहे. कर्नाटकात आधी भाजपची सत्ता असल्याने भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करीत एकहाती सत्ता आणणार असल्याचा विश्वासही व्यक्त करुन दाखवला होता. तर प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी आपली सर्व ताकद पणाला लावली असल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपसाठी ही निवडणूस अत्यंत महत्वाची मानण्यात आलीय. त्यानुसार देशातील भाजपचे अनेक मंत्री, नेते कर्नाटकात काही दिवासंपासून तळ ठोकून होते.

तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं विधान

तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आपल्या उमेदवारांसाठी रॅली, जाहीर सभा, प्रचारफेऱ्यांच्या सत्रांचं आयोजन करुन मतदारांनापर्यंत पोहोचले होते. निवडणुकीच्या अखेरीस भाजपने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही प्रचाराच्या मैदानात उतरवल्याचं पाहायला मिळालं होतं. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक मतदारांसाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरले होते.

काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच ‘भारत जोडो’ यात्रेच्या माध्यमातून देशभरातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्याच प्रयत्न केला. राहुल गांधींचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरणार हे आता येत्या 13 मे रोजीच स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसाठी मैदानात उतरवलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक सभा घेतल्याचं पाहायला मिळालं.

Big Breaking! जालना नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर; एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

या निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बेळगावात प्रचारासाठी गेले होते. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रचार केला असल्याचं पाहायला मिळालं होतं.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचारादरम्यान, जाहीर सभेत अनेक आरोप-प्रत्योरापांच सत्र पाहायला मिळालं होतं.याचदरम्यान, जाहीरनाम्यावरुनही काँग्रेसवर भाजपच्या नेत्यांनी जहरी टीका केल्याचं दिसून आलं होतं. अखेर मतदानानंतर पहिला एक्झिट पोल समोर आला असून या पोलनूसार कर्नाटकात काँग्रेस भाजपला सत्तेतून खाली खेचत आपली सत्ता प्रस्थापित करणार असल्याची परिस्थिती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube