Big Breaking! जालना नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर; एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 10T134236.872

Jalana Munciple :  जालना नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी प्रलंबित होती. त्यावर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. एबीपीच्या वृत्तानुसार, नगर विकास उपसचिवांनी अधिसूचना जारी केली आहे. नगरपालिकेची महानगरपालिका करताना तुर्तास हद्दवाढ न करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा सुरु होती. दोन तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Shreekant Shinde : स्वतः ची ओळख काकाच्या नावाने… अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेला खासदार शिंदेंचं उत्तर

राज्यात शिंदे सरकार आल्यावर राज्याच्या उपसचिव विद्या हपय्या यांनी जालना जिल्हाधिकारी यांना नगरपालिकांचे रुपांतर महानगरपालिकेत करण्यासाठीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिंदे गटाचे मंत्री अर्जुन खोतकर हे या निर्णयासाठी आग्रही होते.

Sanjay Raut : ‘मी कुठे म्हणतो सामनाला…’ राऊत-पवारांमधील टीकेचा सिलसिला सुरूच

अर्जुन खोतकर हे जवळपास वर्षभरापासून हा निर्णया व्हावा यासाठी प्रयत्नशील होते. तर काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा या निर्णयाला विरोध होता. गेल्या अनेक दिवसांपासून जालनेकरांची ही मागणी होती. त्यावर आता शिक्कामोर्तब जाले आहे. त्यामुळे जालनेकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.

 

 

Tags

follow us