Karnataka Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकांची (Karnataka Elections) घोषणा झाली असून 10 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून यंदा काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. दुसरीकडे भाजपनेही सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनंतर आता भाजपनेही उशीरा का होईना पण उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. असे असताना आता या निवडणुकीच्या आखाड्यात चक्क महाभारतातील शकुनीने एन्ट्री घेतली आहे.
निवडणुकीत महाभारताचा उल्लेख आला. त्यानंतर कुरुक्षेत्रातील संघर्षाचा उल्लेख करत काही लोकांना शकुनी म्हटले गेले.
अजित पवारांनी आमचे 40 आमदार पाडण्याची तयारी केली होती; शहाजी बापूंचा दावा
खरे तर हा सगळा प्रकार राज्यातील हासन विधानसभा मतदारसंघावरून सुरू झाला आहे. या मतदारसंघावरून देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या घरात महाभारत सुरू झाले आहे. देवेगौडा यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे म्हणणे आहे की या जागेवर पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळावी तर दुसरीकडे कुमारस्वामी यांचे भाऊ एच. डी. रेवन्ना यांच्या पत्नी या मतदारसंघात निवडणूक लढवू इच्छित आहेत.
कुमारस्वामी म्हणाले काही लोक त्यांचे भाऊ रेवन्ना यांना काहीतरी सांगून मतदारसंघ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रकरणी देवेगौडा हे देखील रेवन्ना यांची समजूत काढू शकले नाहीत. भवानी रेवन्ना यांना समजावण्याचाही खूप प्रयत्न केला गेला. या जागेवर पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच संधी देण्याचा विचार आहे मात्र तरीदेखील त्यांनी ऐकले नाही.
कुमारस्वामी यांनी याआधीही सांगितले होते, की भाजपला पराभूत करण्यासाठी या मतदारसंघात त्यांच्या परिवारातील कुणा सदस्याला उतरविण्याची काहीच गरज नाही. पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्याला तिकीट देऊन निवडणूक जिंकण्याची ताकद पक्षात आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही आणि पक्षातील कार्यकर्त्यालाच तिकीट दिले जाईल, असे कुमारस्वामी यांनी ठणकावून सांगितले.
PM मोदींना जंगल सफारीत वाघ दिसलाच नाही; वाहन चालकावर ठपका, नोकरीही धोक्यात
त्यांनी पुढे म्हटले, की हासनमध्येे परिवाराला तोडण्यासाठी शकुनी आहेत. शकुनी त्रास देत आहेत. कुरुक्षेत्रात युद्ध का घडले ? तर शकुनीच्या वागणुकीमुळेच हे युद्ध घडले होते यात काहीच शंका नाही. देशात अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत.
शाब्दिक चकमकीनंतर आमदार वैभव नाईकांच्या अंगावर राणे समर्थक धावले…
कोण आहे शकुनी ?
कुमारस्वामी यांनी सांगितले की हे शकुनी दुसरे तिसरे कुणी नसून बाहेरून आलेले लोक आहेत जे खुशमस्करी करण्याचेच काम करत असतात. या शकुनींनीच रेवन्ना आणि त्यांच्या परिवाराला चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत.