Karnataka Government Formation : कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election)कॉंग्रेसनं बहुमत मिळवल्यानंतर आता काँग्रेस सरकार (Karnataka Government Formation)स्थापन करण्यासाठी एकवटली आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक संपली आहे. या बैठकीत मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय होऊ शकला नाही, त्याचा सस्पेन्स कायम आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर (Mallikarjun Kharge) सोडण्याचा निर्णय विधिमंडळ पक्षाने एकमताने घेतला आहे.
Resolution copy of Congress CLP meeting
Congress Legislature Party has unanimously decided to leave the selection of Congress Legislature Party leader to the decision of the AICC President
#KarnatakaElectionResults2023 pic.twitter.com/74tpAcTrsn
— ANI (@ANI) May 14, 2023
बंगळुरूमधील शांगरी-ला हॉटेलमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
डीके शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणं आहे की, मुख्यमंत्रिपदाशिवाय काहीही मान्य नाही, आपल्याला 75 आमदारांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे करणार असल्याचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. म्हणजे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार हे ख ठरवतील. दरम्यान, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार सोमवारी दिल्लीत जाऊ शकतात, अशी माहितीही समोर येत आहे.
काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वीच मोठी बातमी समोर आली होती. विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी चारही नेत्यांनी स्वतंत्र बैठक घेतली. या नेत्यांमध्ये कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, डीके शिवकुमार, सिद्धरामय्या आणि केसी वेणुगोपाल यांचा समावेश आहे. डीके शिवकुमार, सिद्धरामय्या आणि सुरजेवाला यांनी स्वतंत्र बैठका घेतल्या. या बैठकीला केसी वेणुगोपालही उपस्थित होते.