Download App

Karnataka Government : नवा गडी, नवं राज्य… : सिद्धरामय्या होणार शपथबद्ध

Karnataka Government Oath Ceremony : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसनं (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 224 जागा असलेल्या कर्नाटकमध्ये पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. तर 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची (BJP) संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला (JDS)19 जागा मिळाल्या. काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी दोन प्रबळ दावेदार होते. त्यात पहिले माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि दुसरे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार(D.K. Shivakumar). काही दिवसांच्या मंथनानंतर कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. त्यानंतर आता आज कर्नाटक सरकरचा शपथविधी पार पडणार आहे.

Centre Ordinance: दिल्ली सरकारवर केंद्राची कुरघोडी, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात आणला अध्यादेश

या शपथविधी सोहळ्यामध्ये कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्याचबरोबर मंत्रिमंडळात सामिल होणारे 8  आमदार देखील आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळामध्ये कोणाला संधी द्यायची यासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत.

2000 Rupees Note: भारतात फक्त दोन हजाराची नोट मोठी, पाकिस्तानात सर्वात मोठी नोट कितीची माहित आहे का?

हा शपथविधी सोहळा कर्नाटकच्या बंगळुरूमधील श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. याच स्टेडियमवर सिद्धरमय्या यांनी 2013 पहिल्यांदा शपथ घेतली होती. राज्यपाल थावरचंद गेहलोत दुपारी 12.30 वाजता त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.

Karnataka Government : सिद्धरामय्यांच्या सरकारमध्ये कोण मंत्री होणार? हे पाच घटक ठरवतील

या शपथविधी सोहळ्यामध्ये कॉंग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये कॉंग्रेस अध्य़क्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, अनेक मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते या शपथविधी सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहेत.

Tags

follow us