Download App

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना दिलासा; 17 जूनपर्यंत अटक करू नका, हायकोर्टाचे सीआयडीला आदेश

येडियुरप्पा हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते वयोवृध्द असून, ते आजारी आहेत, असे निरीक्षणही हायकोर्टाने नोंदविले आहे.

  • Written By: Last Updated:

Karnataka HC directs CID to not arrest ex-CM Yediyurappa: पोस्कोच्या गुन्ह्यात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते (bjp) बी. एस. येडियुरप्पा (B S Yediyurappa हे अडकले आहेत. पोस्को प्रकरणात बेंगळुरू न्यायालयाने येडियुरप्पा यांना अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. परंतु आता येडियुरप्पा यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 17 जूनपर्यंत येडियुरप्पा यांना सीआयडीने अटक करू नये, असा आदेश कर्नाटक हायकोर्टाने दिला आहे.


बोट आढळलेली ‘ते’ आईस्क्रिम पुण्यात तयार झाले? धक्कादायक माहिती आली समोर

या प्रकरणी बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी येडियुरप्पा यांना अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. तर माझ्याविरोधात दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, अशी याचिका येडियुरप्पा यांनी हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. सीआयडीने येडियुरप्पा यांना 17 जूनपर्यंत अटक करू नये, असा हायकोर्टाने दिला आहे. या याचिकेची पुढील सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.

Video : ‘गजा मारणे गुंड आहे, मला माहीत नव्हतं’; ‘त्या’ भेटीवर खासदार लंके स्पष्ट बोलले

येडियुरप्पा हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते वयोवृध्द असून, ते आजारी आहेत, असे निरीक्षणही हायकोर्टाने नोंदविले आहे. सीआडीच्या विनंतीवरून विशेष न्यायालयाने येडियुरप्पा यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्सही काढले होते. परंतु येडियुरप्पा हे नवी दिल्लीत होते.

काय आहे प्रकरण ?

17 वर्षांच्या मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर युडियुरप्पा यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. पोस्को अ‍ॅक्ट आणि विनयभंग असा गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी महिन्यात येडियुरप्पा यांच्या घरी पीडित मुलगी गेली होती. त्यावेळी युडियुरप्पा यांनी तिचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पीडित मुलीची 54 वर्षीय आई हिचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. फुफसाच्या कर्करोगामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता. तर 81 वर्षी येडियुरप्पा यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तर कायदेशीर लढाई लढू, असे येडियुरप्पा यांनी माध्यमांसमोर जाहीर केलेले आहे.

follow us