Download App

कर्नाटकात काँग्रेसची फजिती! मतचोरीच्या दाव्यावर मंत्र्याचे थेट राहुल गांधींनाच आव्हान; काँग्रेसने खुर्चीच काढली

कर्नाटकात काँग्रेसची मोठी फजिती झाली. इतकेच नाही तर राज्याचे सहकार मंत्री केएन राजन्ना यांना थेट राजीनामाच द्यावा लागला.

Karnataka News : देशात सध्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) मतचोरीच्या मुद्द्यावरुन खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी पुरावे देत त्यांनी निवडणूक आयोग (Election Commission) आणि भाजपला घाम फोडला आहे. यासंदर्भात काल विरोधी पक्षांनी मोठे आंदोलनही केले होते. दुसरीकडे मात्र याच मुद्द्यावरुन कर्नाटकात काँग्रेसची मोठी (Karnataka News) फजिती झाली. इतकेच नाही तर राज्याचे सहकार मंत्री केएन राजन्ना यांना थेट राजीनामाच द्यावा लागला. राजन्ना यांनी मतदार यादीत झालेल्या (Voter List) अनियमिततेवर आपल्याच पक्षाच्या (काँग्रेस) मौनावर प्रश्न उपस्थित केले होते. याची शिक्षा म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊ या..

राजन्नांच्या वक्तव्याने काँग्रेसलाच दणका

कर्नाटकातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीत अनियमितता होती. राहुल गांधी यांनी हा प्रकार म्हणजे मतचोरी असल्याचे सांगितले होते. परंतु, हा प्रकार काँग्रेस सरकारच्या काळातच झाला होता. त्यावेळी पक्षाने यावर काहीच आक्षेप घेतला नव्हता. राजन्ना यांची अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेच्या एकदम उलट होती. यावर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. राजन्ना यांच्या वक्तव्याने कर्नाटकच्या राजकारणात मात्र नवीन वादळ उठले. यानंतर काँग्रेस हायकमांडने कठोर भूमिका घेत राजन्ना यांना मंत्रिमंडळातून हटवण्याच्या सूचना मुख्यमंत्री सिद्धारमैय्या यांना दिल्या होत्या. यानंतर राजन्ना यांनी सिद्धरामैय्या यांना राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा स्वीकार केला.

सरकार निवडणूक आयोगापर्यंत पोहोचू देत नाही, एवढी कसली भीती आहे?, खर्गेंचा संतप्त सवाल

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. यानंतर बंगळुरुत एक रॅली आयोजित केली. या रॅलीत त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. केंद्रातील भाजप सरकार मतांची चोरी करून सत्तेत आले. यावेळी त्यांनी महादेवपुरा मतदारसंघाचे उदाहरण दिले होते. याठिकाणी एक लाख बोगस मतदार यादीत समाविष्ट होते असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

काय म्हणाले होते राजन्ना ?

राहुल गांधींच्या या आरोपांवर काँग्रेस सरकारमधील मंत्री केएन राजन्ना यांनी प्रतिक्रिया दिली होती. मतदारयाद्यांत ज्यावेळी संशोधन करण्यात त्यावेळी आमच्याच पक्षाचे (काँग्रेस) सरकार सत्तेत होते हे विसरून चालणार नाही. त्यावेळी आमच्याच पक्षाने का डोळे मिटून घेतले होते. अनियमितता झाली हे खरं आहे ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. हा सगळा प्रकार घडला पण पक्षाने त्यावेळी याची जबाबदारी का घेतली नाही? त्यावेळी या प्रकाराची निगराणी का केली गेली नाही? मतचोरीच्या दाव्यावर राहुल गांधींनाच आव्हान दिल्याचे उघड झाले होते.

कोण आहेत केएन राजन्ना

राजन्ना कर्नाटकातील दिग्गज राजकीय नेते आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. राजीनामा देण्याच्या आधी ते सहकार खात्याचे मंत्री होते. राजन्ना यांचा जन्म 13 एप्रिल 1951 रोजी तुमकूर तालु्क्यात झाला होता. त्यांनी बीएससी आणि एलएलबी पदव्या घेतल्या आहेत. 1972 पासून त्यांनी सहकारी आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. राजन्ना सन 1998 मध्ये पहिल्यांदा विधानपरिषदेचे आमदार झाले होते. यानंतर मधुगिरी मतदारसंघातून निवडून आले. सन 2013 आणि 2023 मध्येही आमदार म्हणून निवडून आले. 2008 आणि 2018 च्या निवडणुकांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

INDIA Alliance March : मोठी बातमी, राहुल गांधी – संजय राऊत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

follow us