Kerala News : केरळ राज्यातील एर्नाकूलम जिल्ह्यातील कोच्ची येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ऐकून कुणालाही संताप यावा असंच घडलं आहे. येथील एका खासगी मार्केटिंग कंपनीने आपल्याच कर्मचाऱ्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली आहे. तसा आरोप या कंपनीवर केला जात आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेलं टार्गेट पूर्ण केलं नाही तर कठोर शिक्षा दिली जाते. टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पट्ट्याने बांधले जाते आणि गुडघ्यावर रांगायला सांगितले जाते. इतकेच नाही तर फरशीवर एखादे नाणे ठेऊन ते जिभेने चाटायला सांगितले जाते. या अघोरी शिक्षेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
या शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. राज्य सरकारच्या श्रम विभागानेही या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या या अपमानास्पद प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. श्रम मंत्री वी. शिवनकुट्टी यांनी सांगितले की या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा श्रम अधिकाऱ्यांनी या घटनेचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दोन काँग्रेसी काँग्रेसलाच खटकतात, कर्नाटक अन् केरळच्या ‘मूड’चा काँग्रेसला फटका?
सोशल मीडियात जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात स्पष्ट दिसत आहे की एका कर्मचाऱ्याला पट्ट्याने बांधलेलं आहे. नंतर त्याला गुडघ्यांवर रांगायला सांगितलं जात आहे. इतकेच नाही तर त्याला फरशीवर ठेवलेलं नाण चाटायला सांगितलं जात आहे. याबाबत कंपनीतील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की टार्गेट पूर्ण झाले नाही तर कठोर शिक्षा दिली जाते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना एका प्रायव्हेट मार्केटिंग फर्ममध्ये घडली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली. या प्रकरणात आमच्याकडे कुणीही तक्रार केलेली नाही. जागेच्या मालकानेही देखील सर्व आरोप नाकारले आहेत. या प्रकरणात कोणतीच तक्रार दाखल झालेली नाही. तरी देखील माहिती मिळताच चौकशी सुरू करण्यात आली आहे. श्रम मंत्री वी. शिवनकुट्टी यांनी हा व्हिडिओ हैराण करणारा असल्याचे म्हटले.
केरळ अन् तामिळनाडूत कचऱ्याचा वाद; जाणून घ्या, ‘बायोमेडिकल वेस्ट’ची A टू Z माहिती..