केरळ अन् तामिळनाडूत कचऱ्याचा वाद; जाणून घ्या, ‘बायोमेडिकल वेस्ट’ची A टू Z माहिती..

केरळ अन् तामिळनाडूत कचऱ्याचा वाद; जाणून घ्या, ‘बायोमेडिकल वेस्ट’ची A टू Z माहिती..

Bio Medical Waste : दक्षिण भारतातील दोन राज्य. तामिळनाडू आणि केरळ सध्या आमनेसामने आले (Bio Medical Waste)आहेत. वादाचं कारण आहे बायामेडिकल कचरा. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याची चर्चा होत आहे. केरळ राज्यातील दवाखाने आणि आरोग्य केंद्रांतील बायोमेडिकल वेस्ट तामिळनाडूत पाठवले जात होते. परंतु, तामिळनाडूतील स्थानिक नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्ते यावर चांगलेच नाराज झाले. केरळमधून येणारा हा कचरा लोकांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहे असा आरोप तामिळनाडूने केला आहे. केरळने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करून आणि नियमांचं पालन करून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा केरळने केला आहे.

तामिळनाडूतील लोकांनी कचऱ्याचे ट्रक अडवायला सुरुवात केल्यानंतर या वादाला तोंड फुटलं. नंतर परिस्थिती इतकी चिघळली की तामिळनाडू सरकारला यावर कठोर भूमिका घ्यावी लागली. नंतर हा वाद थेट नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) पर्यंत पोहोचला. तीन दिवसांत तामिळनाडूत डंप केलेला सर्व प्रकारचा कचरा हटवा असे आदेश ट्रिब्यूनलने केरळ आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

Aapla Dwakahana : आजपासून राज्यात ‘आपला दवाखाना’सुरू, योजना नेमकी काय आहे?

बायोमेडिकल वेस्ट म्हणजे काय?

रोज सकाळी आपल्या घरासमोर कचऱ्याची गाडी येते. कचरा टाकताना तुमच्या लक्षात आलंच असेल की ओला कचरा, सुका कचरा वेगळा करून टाकण्याचे सांगितले जाते. खरंतर कचरा विविध प्रकारचा असतो. सॉलिड वेस्ट, प्लास्टिक वेस्ट, ई वेस्ट असे काही प्रकार कचऱ्याचे आहेत. बायो मेडिकल वेस्टही अशाच प्रकारचा एक कचरा आहे. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रुल्स 2016 नुसार असा कचरा जो दवाखान, लॅबोरेटरी, रक्त पेढी आणि अन्य आरोग्य संस्थांत जमा होतो त्याला बायोमेडिकल वेस्ट म्हटले जाते.

बायोमेडिकल कचरा धोकादायक का?

बायोमेडिकल वेस्ट कोणत्या ना कोणत्या पद्धतीने रुग्णांच्या उपचारासाठी वापरला जात असतो. त्यामुळे या कचऱ्यापासून संसर्ग फैलावण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य देखभाली दरम्यान जितका कचरा तयार होतो त्यातील १५ टक्के कचरा धोकादायक मानला जातो. हा कचरा संक्रामक, रासायनिक असू शकतो.

सन २०१० मध्ये अनसेफ इंजेक्शनमुळे ३३ हजार ८०० नवीन एचआयव्ही केसेस, १.७ बिलियन हेपेटायटिस बी संक्रमण आणि ३१ हजार ५०० हेपेटायटिस सी संक्रमण झाल्याचे आढळून आले होते. यामुळे बायोमेडिकल वेस्ट कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करणे खूप महत्वाचे ठरते. हा कचरा माती आणि पाणी प्रदूषित करू शकतो. हा कचरा जाळला तर वातावरणात ग्रीन हाऊस वायूंचा प्रभाव वाढतो ज्यामुळे क्लायमेट चेंज होतो.

कोरोनापेक्षाही ‘हा’ आजार ठरतोय धोकादायक; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल

बायोमेडिकल वेस्ट का आणि किती वाढतोय?

कोरोना साथीच्या काळात बायोमेडिकल कचऱ्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. या काळात मास्क, फेस शील्ड, पीपीई किट्स, यांसारख्या साधनांचा वापर प्रचंड वाढला होता. मास्क, पीपीई किट्स एकदा वापरून टाकून द्यावे लागत होते. परिणामी जगभरात बायोमेडिकल वेस्टचा साठा होऊ लागला होता. सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डच्या माहितीनुसार कोविडआधी देशात दररोज सरासरी ६९० टन मेडिकल वेस्ट तयार व्हायचे. परंतु, कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर दररोज १०० टन मेडिकल वेस्टची यात भरली पडली.

कचरा विल्हेवाटीची योग्य पद्धत काय?

एच१एन१ च्या प्रकरणात तयार होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या प्रक्रियेला आदर्श मानण्यात आले होते. याच आधारावर कोविड संकटाच्या काळातील मेडिकल वेस्ट विल्हेवाटीसाठी गाइडलइंस तयार करण्यात आल्या. मेडिकल वेस्टसाठी ठरवून दिलेल्या रंगाच्या कचरापेटीतच हा कचरा टाकावा ही पहिली पायरी आहे.

पिवळी कचरापेटी – बॉडी वेस्ट, केमिकल वेस्ट, खराब कपडे, औषधे किंवा लॅबमधील कचरा यात टाकला जातो.

लाल कचरापेटी – संक्रमित प्लास्टिक कचरा यात टाकला जातो. यामध्ये ट्यूबिंग, प्लास्टिकच्या बाटल्या, सुई नसलेले सिरिंज यांचा समावेश होतो.

काळी कचरापेटी – एक्सपायर झालेले कीटकनाशक, सॅनेटायजरच्या बाटल्या. बल्ब, बॅटरी अशा प्रकारचा कचरा यात टाकला जातो.

अस्मानी कचरापेटी – असा कचरा जो आपोआप डिस्पोज होतो किंवा असा कचरा जो रिसायकल केला जाऊ शकतो तो कचरा यात टाकला जातो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube