Tamil Nadu: तमिळनाडूला मिळाला मोठ प्रकल्प; ‘गोरिला ग्लास’ प्रकल्पातून तरुणांना रोजगार

Tamil Nadu: तमिळनाडूला मिळाला मोठ प्रकल्प; ‘गोरिला ग्लास’ प्रकल्पातून तरुणांना रोजगार

Gorilla Glass Project : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात काही नवीन उद्योग आलेला नाही. तसंच, काही येता-येता गुजरात किंवा इतर राज्यात गेले आहेत. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये मोठा संघर्षही झाला आहे. (Tamil Nadu) परंतु, पाहिजे तसा काही उद्योग व्यवसाय आला नाही. (LOk Sabha) अशातच आता एक उद्योग देशात आला असून तो तामिळनाडू या राज्यात गेला आहे.

प्रकल्पाची पायाभरणी लोकसभा अध्यक्षपदासाठी आज मतदान, यापूर्वी कधी झाली होती लढत अन् कोण होतं उमेदवार?

मोबाईल कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील जागतिक कंपनी कॉर्निंग कार्पोरेशनने ऑप्टिमस इन्फ्राकॉम या दूरसंचार व उत्पादन कंपनीशी भागीदारी करून तमिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील सिपकॉट पिल्लईपक्कम औद्योगिक वसाहतीमध्ये भारत इनोव्हेटिव्ह ग्लास टेक्नॉलॉजीज या उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी केली आहे.

अनुकूल वातावरण

हा प्रकल्प उच्च गुणवत्तेच्या कव्हर ग्लास पार्टचे उत्पादन करणारा देशातील पहिला प्रकल्प आहे. येथे तयार करण्यात आलेल्या उपकरणांची निर्यातही केली जाणार आहे. हा प्रकल्प भारतीय व जागतिक बाजारपेठेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, या प्रकल्पामुळे तमिळनाडूमधील मजबूत पायाभूत सुविधा, कुशल कामगार आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण अधोरेखित झालं आहे.

कॉर्निंग गोरिला ग्लास मोठी बातमी : लोकसभेत आता घमासान ! Rahul Gandhi यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

या नव्या प्रकल्पामुळे राज्यात रोजगाराच्या शेकडो संधी निर्माण होण्यासह जागतिक उत्पादनाचं केंद्र बनवण्याच्या उद्दिष्टातही लक्षणीय योगदान मिळेल, असं मत उद्योग व वाणिज्य मंत्री टी. आर. बी. राजा यांनी व्यक्त केलं. यावेळी ‘कॉर्निंग गोरिला ग्लास’चे उपाध्यक्ष डेव्हिड वेलास्क्वेझ व ‘ऑप्टिमस इन्फ्राकॉम’चे कार्यकारी अध्यक्ष अशोक गुप्ता उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube