Download App

Atiq-Ashraf च्या मारेकऱ्याची कबूली, हत्यारं देणाऱ्यांची सांगितली नावं

killer confesses in Atiq Ashraf Murder Case: चार दिवसांपूर्वी कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत असतांनाच त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, अतिकच्या मृत्यूनंतर त्याच्या कारनाम्यांच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत.

यामध्ये आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान आता माहिती समोर आली आहे की, पोलिसांच्या ताब्यात असलेला अतिक आणि अशरफ यांचा मारेकरी शूटर सनी याने एक कबूली दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे.

या मारेकऱ्याने सांगितले की, या तिघांना दिल्लीतील जितेंद्र गोगी गिरोह यांच्या मार्फत हत्यारं मिळआली होती. कानपुरचा बाबरही या गॅंगशी जोडलेला आहे. बाबरच्या माध्यामातून हे तिघे गोगी गॅंगच्या संपर्कात आले होते. मात्र तिघे वारंवारं आपली विधान बदलत असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवणं देखील खरं नाही.

Atiq Ahmed : अतिक अहमदचं राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होणार होतं ‘सेकंड होम’?

काय आहे गोगी गॅंग?
सप्टेंबर 2021 मध्ये जितेंद्र गोगीची रोहिणी कोर्टात हत्या करण्यात आली. तो लॉरेन्स बिश्नोईचा (lorence Bishnoi) अगदी जवळचा होता. तर अतिक आणि अशरफ यांच्या मारेकऱ्यांकडून त्याला एनसाआरमध्ये मोठी घटना घडवायची होती. त्यामुळे त्याने त्यांना एनसीआर चॅनलचं आयडी कार्ड, मोठा कॅमरा दिला होता. तर या तिन आरोपींनी देखील या अगोदर त्यांना लॉरेन्स बिश्नोईप्रमाणे व्हायचं होत अशी कबूली दिली होती.

दरम्यान आधी गँगस्टर आणि नंतर राजकारणी (Politician)झालेला अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफला (Ashraf Ahmed)गोळ्या घालून ठार मारल्याप्रकरणी अटक केलेले तीन हल्लेखोर हे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांनी लहान वयापासूनच गुन्हेगारीच्या (Criminal)जगतात प्रवेश केला होता. खून, दरोडा यासह गंभीर गुन्ह्यात तिघेही तुरुंगात गेले आहेत. तुरुंगातच त्यांची मैत्री झाली. या तिघांना अतिक आणि अशरफची हत्या करून डॉन व्हायचे होते, अशी माहिती समोर आली आहे.हमीरपूरचा रहिवासी सनी, कासगंजचा रहिवासी अरुण मौर्य आणि बांदा येथील लवलेश तिवारी या तिघांनाही अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघा भावांची हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस रेकॉर्डनुसार ते अट्टल गुन्हेगार आहेत. तिघांचीही कोल्विन रुग्णालयात ठेवून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Tags

follow us