Download App

RBI चे नवे बॉस संजय मल्होत्रा यांच्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही

Sanjay Malhotra :  केंद्रीय सरकारने मोठा निर्णय घेत  भारतीय रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती कलेची आहे. केंद्र सरकारचे

  • Written By: Last Updated:

Sanjay Malhotra :  केंद्रीय सरकारने मोठा निर्णय घेत  भारतीय रिझर्व्ह बँकच्या (RBI) गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती कलेची आहे. केंद्र सरकारचे  महसूल सचिव संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) आरबीआयचे 26 वे गव्हर्नर असणार आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 12 डिसेंबर 2024 पासून संजय मल्होत्रा यांची पुढील तीन वर्षांसाठी आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे.

संजय मल्होत्रा सध्या अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कार्यरत आहेत आणि 11 डिसेंबरपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा पदभार स्वीकारतील.  माहितीनुसार, संजय मल्होत्रा ​​हे 1990 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. ते विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांची जागा घेतील, ज्यांचा दुसरा कार्यकाळ उद्या म्हणजेच मंगळवारी (10 डिसेंबर 2024) संपत आहे.

 कोण आहेत संजय मल्होत्रा?

माहितीनुसार, आतापर्यंत संजय मल्होत्रा यांनी फायनान्स, पॉवर, आयटी, टॅक्सेशन आणि खाणी या क्षेत्रांमध्ये काम केला आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य या दोन्ही पातळ्यांवर वरिष्ठ पदावर काम केले आहे. डिसेंबर 2022 मध्ये महसूल सचिव म्हणून त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी ते वित्त सेवा विभागाचे सचिव होते, जिथे त्यांनी वित्तीय सुधारणांचा पाठपुरावा करण्यात आणि बँकिंग क्षेत्राला बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

श्रीलंकेचा पराभव अन् दक्षिण आफ्रिकेने दिला ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, WTC टेबलमध्ये फेरबदल

संजय मल्होत्रा यांनी कर संकलनातील वाढीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि जीएसटी परिषदेचे पदसिद्ध सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. आपल्या धोरणात्मक विचारसरणीसाठी ओळखले जाणारे, संजय मल्होत्रा यांनी यापूर्वी सरकारी REC चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद भूषवले आहे. केंद्र सरकारने संजय मल्होत्रा यांची अशा वेळी आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे जेव्हा देशातील अर्थव्यवस्था महत्त्वाची आव्हाने आणि सुधारणांमधून जात आहे.

follow us