Kolkata Sandip Ghosh : कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना (Sandip Ghosh) सीबीआयने दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. याच संदीप घोषवर (Kolkata Case) संतापलेल्या जमावाने हल्ला केला आहे. न्यायालयातून बाहेर पडत असतानाच एका व्यक्तीने संदीप घोषला जोरदार झापड लगावली. सीआरपीएफ आणि कोलकाता पोलिसांच्या (Kolkata Police) संरक्षण असतानाही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. संदीप घोषला पाहून काही जणांनी शिवीगाळही केली तसेच चोर-चोर अशा घोषणाही दिल्या.
CBI ची मोठी कारवाई, आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सीबीआयचे पथक संदीप घोषला घेऊन अलीपूर न्यायालयात आले होते. याआधीच येथे लोकांची मोठी गर्दी झाली होती. लोकांमध्ये संताप दिसून येत होता. संदीप घोष येथे आल्यानंतर जमावाने चोर चोर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या गर्दीत वकिलांसह सर्वसामान्य लोकही सहभागी झाले होते. यानंतर संदीप घोषला कोर्टाच्या आवारातून बाहेर न्यायचे होते. येथील परिस्थिती पाहता बंदोबस्त तैनात करण्यात आला.
सीआरपीएफच्या जवानांनी सर्व परिसराची घेराबंदी केली. सीबीआय ज्यावेळी संदीप घोषला घेऊन बाहेर पडले त्यावेळी मात्र लोकांनी गोंधळ केला. सीबीआयचे पथक त्यांना वाहनात बसवत असतानाच एक व्यक्ती पुढे आला आणि त्याने संदीप घोषच्या कानशिलात लगावली. यावेळीही येथे जमाव चांगलाच संतप्त झाला होता. सीबीआयचे अधिकाऱ्यांनी कसेबसे येथून बाहेर पडले.
बस, आता खूप झालं, मी निराश अन् भयभीतही.. कोलकाता घटनेवर राष्ट्रपतीही उद्विग्न
संदीप घोष यांच्यावर आरोप काय?
अख्तर अली यांनी याचिकेत माजी प्राचार्य संदीप घोष यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले होते. जुलै 2023 मध्ये राज्य दक्षता आयोगाला मी लेखी तक्रार दिली होती. पण घोष यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. या रॅकेटमध्ये जो कुणी सामील असेल त्या सगळ्यांचाच पर्दाफाश व्हावा अशी माझी इच्छा असल्याचे अली यांनी सांगितले. रुग्णालयात जमा होणाऱ्याा बायोमेडिकल कचऱ्याची बेकायदेशीरपणे विक्री करणे, औषधे आणि विविध उपकरणांच्या पुरवठादारांकडून कमिशन घेऊन टेंडर पास करणे तसेच परीक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पाच ते दहा लाख रुपयांची मागणी करणे असे अनेक गंभीर आरोप संदीप घोष यांच्यावर ठेवण्यात आले होते.