Mata Vaishno Devi Landslide : माता वैष्णो देवी येथे झालेल्या मुस्खलनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे भूस्खलनाच्या घटनेनंतर वैष्णो देवीची (Mata Vaishno Devi Landslide) यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. अधकवारी येथील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलन झाले आणि प्रशासनाचे बचाव कार्य सुरू आहे.
मंदिराकडे जाणाऱ्या 12 किमी वळणाच्या मार्गावर ही आपत्ती आली आणि प्रवास थांबवावा लागला. हिमकोटी मार्गावर सकाळपासूनच प्रवास पुढे ढकलण्यात आला होता, परंतु दुपारी 1.30 वाजेपर्यंत प्रवास जुन्या मार्गावर सुरू होता. तथापि, मुसळधार पावसामुळे अधिकाऱ्यांनी पुढील आदेशापर्यंत या मार्गावरून प्रवास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
तर दुसरीकडे माता वैष्णोदेवी यात्रा सध्या थांबविण्यात आली आहे आहे. अर्धकुंभरी ते भवन हा मार्ग बंद करण्यात आला आहे. खालच्या ट्रॅकवरून भाविकांची हालचाल देखील प्रतिबंधित करण्यात आली आहे. यात्रेत असलेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येत आहे. पावसामुळे जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद आहेत.
राजगड सहकारी साखर कारखान्याच्या 402 कोटी 90 लाखांच्या कर्जास मान्यता; राज्य सरकारचा मोठा निर्णय
शाळांमध्ये सुट्टी जाहीर
खराब हवामानामुळे विविध सुरक्षा दलांमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाने जम्मू विभागातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 27 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. जम्मू आणि काश्मीर शालेय शिक्षण मंडळाने बुधवारी होणाऱ्या दहावी आणि अकरावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा देखील केली आहे. बीएसएफने माहिती दिली की जम्मूच्या पलौरा कॅम्प येथे होणारी कॉन्स्टेबल (जीडी) भरती परीक्षा खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आली आहे.