Download App

video: काळीज पिळवटून टाकणारी दृष्य; आम्हाला वाचवा, वायनाड भूस्खलन दुर्घटेतील लोकांची आर्त हाक

वायनाडमध्ये भूस्खलनामुळे सर्वत्र उद्ध्वस्त झालेली घरं, फुगलेल्या नद्या आणि उन्मळून पडलेल्या झाडांची दृश्ये दिसत आहेत.

  • Written By: Last Updated:

Wayanad Landslide : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे सर्वत्र उद्ध्वस्त झालेली घरं, फुगलेल्या नद्या आणि उन्मळून पडलेल्या झाडांची दृश्ये दिसत आहेत. सध्या भूस्खलनग्रस्त भागात लष्कर पोहोचले आहेत. (Wayanad) एनडीआरएफसह अनेक पथकं बचाव कार्य करत आहेत. मात्र, पावसाची संततधार कायम असल्याने मदत कार्यात अडथळे निर्माण होत आहे. या अपघातात आत्तापर्यंत सुमारे 143 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाढ होण्याच शक्यता आहे.

जिद्दीला सलाम! सात महिन्यांची गरोदर असताना ऑलिम्पिकमध्ये सहभागी; जगभरातून कौतुकाचा वर्षाव

कोणीतरी या आणि आम्हाला वाचवा, मदत करा, आम्ही आमचं घर गमावलं आहे. कुटुंबातील सदस्य जिवंत आहे की नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. ते दलदलीत अडकले आहेत. त्याचे तोंड चिखलाने भरलेले आहे. कोणीतरी त्यांना वाचवा, अशी विनंती वायनाडमधील चुर्लामाला भागात भूस्खलनात अडकलेली महिला करत होती. हे सगळ अंगावर काटा उभा करणार दृष्य आहे.

भूस्खलनामुळे झालेल्या विध्वंसानंतर जिल्हा रुग्णालयात रडणारे लोक जमिनीवर पडलेल्या मृतदेहांच्या रांगेत आपल्या नातेवाईकांना शोधत होते. आपल्या नातेवाईकांचे मृतदेह पाहून काहींना धक्का बसला, तर ज्यांचे नातेवाईक जखमी झाले त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

राजीव गांधी फाउंडेशनमध्ये किती SC- ST, राहुल गांधींच्या दाव्यावर अर्थमंत्र्यांनी दिला प्रत्युत्तर

एका स्थानिक अंगणवाडी सेविकेने सांगितलं की, ती चार जणांच्या कुटुंबाचा शोध घेत आहे, ज्यात एका 12 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे जिला ती बऱ्याच काळापासून ओळखत होती. सकाळी त्याच्या काही नातेवाईकांनी मला फोन केला आणि संपूर्ण कुटुंब बेपत्ता असल्याचं सांगितले. दुर्दैवाने, मला अद्याप त्यापैकी काहीही सापडले नाही असंही ती म्हणाली.

follow us