जिद्दीला सलाम! सात महिन्यांची गरोदर असताना ऑलिम्पिकमध्ये सहभागी; जगभरातून कौतुकाचा वर्षाव

जिद्दीला सलाम! सात महिन्यांची गरोदर असताना ऑलिम्पिकमध्ये सहभागी; जगभरातून कौतुकाचा वर्षाव

Paris Olympics 2024 : ऑलिंपिकसाठी पात्र ठरून आपली गुणवत्ता सादर करण्यासाठी वयाचं बंधन नाही. (Paris Olympics) मात्र, पॅरिस ऑलिंपिक त्याही पलीकडे गेलं आहे. इजिप्तची नादा हफिझ ही सात महिन्यांची गर्भवती सोमवारी झालेल्या महिला तलवारबाजी स्पर्धेत खेळली. ती गर्भवती असल्याचं जेव्हा समोर आलं तेव्हा तिच्या जिद्दीचं सर्वत्र कौतूक होत आहे.

आज मनिका बत्रा, पीव्ही सिंधू गाजवणार मैदान, एका क्लीकवर जाणून घ्या भारताचे वेळापत्रक

वैयक्तिक सब्रे गटात २६ वर्षीय नादा हफिझ ही सहभागी झाली. परंतु, ती पराभूत झाली. ‘सोमवारी मी व्यासपीठावर आले तेव्हा आम्ही तिघे तेथे होतो. मी, माझी प्रतिस्पर्धी आणि अजून या विश्वास येण्याच्या प्रतीक्षेत असलेले माझे मूल…’ अशी प्रतिक्रिया तिने दिली. हफिझ ही इजिप्तची राजधानी कैरोतील रहिवासी आहे आणि हे तिचे तिसरे ऑलिंपिक आहे. माझ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत ऑलिंपिकमध्ये खेळणे हे प्रतिष्ठेचे आहे, अशी भावना हफिझने व्यक्त केली.

हफिझने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या एलिझाबेथ तार्ताकोवस्की हिचा १५-१३ असा पराभव शानदार सुरुवात केली होती. परंतु, पुढच्या फेरीत तिला दक्षिण कोरियाच्या जिऑन ह्याँगकडून पराभव स्वीकारावा लागला. ‘या दोन सामन्यांत माझ्यासह माझ्या मुलाचाही शारीरिक आणि मानसिकतेचा तेवढाच वाटा आहे, असं हफिझ म्हणाली.

इतकी वर्ष नेतृत्व करेल असं वाटलं नव्हत भारताचा स्टार टेनिस खेळाडू रोहन बोपन्नाची निवृत्तीची घोषणा

गर्भवती राहणं सोपं नाही. वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागतो. तसंच हे जीवन आणि खेळ यांच्यातील समतोलपणा साधण्यासाठीही कसरत करावी लागते. परंतु, खेळासाठी हे सर्व सहन करण्यासारखं आहे, असे सांगणाऱ्या हफिझने पती इब्राहिम आणि संपूर्ण कुटुंबाचे आभार मानले. दरम्यान, अशा परिस्थितीमध्ये कोणकोण खेळलं होत याचीही माहिती समोर आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube