Wayanad Landslide: केरळमधील वायनाड जिल्ह्यात जणू निसर्गाचा हाहा:कार झालाय. (Wayanad ) मुसळधार पावसानंतर वायनाडमध्ये भूस्खलन झालं. भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 145 च्या पुढे पोहोचली आहे. तर अद्याप 90 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. एनडीआरएफ, नौदल आणि वायूदलाच्या वतीनं बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे मातीचा चिखल झाला आहे, त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत 128 जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप वायनाडमध्ये हवामान फारसं सुधारलेलं नाही. मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट आहे. त्यामुळे बचाव पथकाला मोठी अडचण येत आहे. या दुर्घटनेनंतर केरळ सरकारनं दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
राजीव गांधी फाउंडेशनमध्ये किती SC- ST, राहुल गांधींच्या दाव्यावर अर्थमंत्र्यांनी दिला प्रत्युत्तर
200 हून अधिक लष्कराचे जवान
वायनाडमध्ये निसर्गाचा विध्वंस मन हेलावून टाकणारा आहे. मलप्पुरमच्या पोथुकल्लू परिसरातून 10 मृतदेह सापडले आहेत. जिथे भूस्खलन झालं, तिथून चालियार नदीत वाहून गेले होते. बचाव पथकानं दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अजूनही आणखी लोक अडकल्याची शक्यता आहे. नागरी संरक्षण, पोलीस, अग्निशमन विभाग, एनडीआरएफचे सुमारे 250 कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. तसंच, लष्कराच्या 122 इन्फंट्रीचे सुमारे 225 जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. भारतीय हवाई दलाने कोईम्बतूरमधील सुलूर एअरबेसवरून 2 हेलिकॉप्टर पाठवले आहेत.
Paris Olympics 2024: बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिरागने रचला इतिहास, क्वार्टर फायनलमध्ये धडक
राहुल गांधी जाण्याची शक्यता
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वायनाडला जाण्याची शक्यता आहे. वायनाडमधील भूस्खलनानंतर तब्बल 45 मदत शिबिरं सुरू करण्यात आली. या शिबिरांमध्ये तब्बल तीन हजारांहून अधिक लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे. वायनाडमध्ये सर्वात आधी मध्यरात्री 2 वाजता भूस्खलन झालं. त्यानंतर पुन्हा पहाटे 4 च्या सुमारास भूस्खलन झालं. दरम्यान, वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनीही वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख संसदेत बोलताना केला.