Italy Bus Crash : भीषण अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली; 21 मृत्यूमुखी
Italy Bus Crash : युरोपियन देश इटलीमध्ये भीषण अपघात (Italy Bus Crash) झाला आहे. या अपघातात 21 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात (Accident) झाला. या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघात (Road Accident) कशामुळे घडला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. इटलीतील व्हेनिस शहरात ही घटना घडली. या मृत्यूमुखी पडलेल्यांत बसचालकाचाही समावेश आहे. जखमी झालेल्यांतील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Dengue Outbreak : बांग्लादेशात डेंग्यूचं थैमान! तब्बल ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातांतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. त्यातील 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने इटलीतील रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
At least 20 dead after bus falls from Venice bridge, reports AFP, quoting city hall
— ANI (@ANI) October 3, 2023
इटलीतील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रुगनारो यांनी सांगितले, की मंगळवारी सायंकाळी व्हेनिसच्या मेस्त्रे येथे एक बस उलटली आणि रस्त्याच्या खाली गेले. रेल्वे रुळाजवळ पडलेल्या बसने लगेचच पेट घेतला. या दुर्घटनेत 21 प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र, यातील 15 प्रवाशांना सुखरूप वाचविण्यात यंत्रणांना यश मिळाले. पोलिस आणि अन्य यंत्रणांच्या मदतीन ढिगाऱ्याखाली अडकलेल्या काही जणांना बाहेर काढण्यात आले. आणखीही काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. त्यामुळे येथे अजूनही बचावकार्य सुरू आहे.
अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. अपघात नेमका कशामुळे घडला, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. या घटनेचा तपास सुरू केला आहे. महापौरांनीही या घटनेबाबत ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. रस्ते अपघातांची संख्या इटलीतही वाढली आहे. या घटना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.