Download App

भाषा वाद विकोपाला! तामिळनाडूने बजेटमध्ये हटवलं रुपयाचं चिन्ह, कारणही धक्कादायक

rupee symbol निर्णय तामिळनाडू राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घेतला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Language dispute escalates Tamil Nadu removes rupee symbol from budget : हिंदी भाषा आणि दाक्षिणात्य भाषा हा वाद नेहमीच पाहायला मिळतो. त्यात दाक्षिणात्य लोक हिंदील राष्ट्रभाषा म्हणून मान्यता देण्यास विरोध करतात. मात्र वाद आता फार विकोपाला गेला आहे. यामध्ये तामिळनाडू सरकारने आगीत तेल ओतल्याप्रमाणे केले आहे. तामिळनाडूच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये थेट रूपयाचे चिन्ह हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

नुकतच तामिळनाडू राज्याचा 2025-26 या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.. त्यामध्ये भारतीय चलन असलेल्या रूपयाचं चिन्ह हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या ऐवजी आता तामिळ प्रतिक लिहील जाणार आहे. यात महत्त्वाची गोष्टी ही आहे गकी, तामिळनाडू हे असं पहिलं राज्य आहे. ज्यांनी देशाच्या राष्ट्रीय मुद्रेचं प्रतिक हटवलं आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकार राष्ट्रीय सुरक्षा नितीच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

DMK नेत्याच्या मुलानेच बनवलं होतं रुपयाचं चिन्ह; तामिळनाडू सरकारने का हटवलं?

यावर आता विविध स्तरावरून टीका करण्यात येत असून अनेक प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे. तसेच भाषा वाद देखील विकोपाला गेला आहे. यावर भाजप नेत्यांनी विरोध करताना 2024 च्या अर्थसंकल्प आणि आताचा अर्थसंकल्रप सोशल मिडीयावर शेअर करायाला सुरूवात केली आहे. हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

“जयंत पाटलांचे मन कशातच लागत नाही, त्यांनीच मला सांगितलं”, मुश्रीफांच्या दाव्याने खळबळ!

दुसरीकडे तामिळनाडू सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारमध्ये सध्या तणावाचे वातावऱण आहे. त्या दरम्यान तामिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय एक धक्का मानला जात आहे. हा विषय आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. तामिळनाडू सरकारचा आरोप आहे की, केंद्र सरकार त्यांच्यावर हिंदी भाषा थोपवत आहे. तर त्यामुळे त्यांनी NEP 2020 यातील अनेक मुद्दे लागू करण्यास विरोध केला आहे. ज्यामध्ये तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीय असायला हव्या अशी अट आहे.

होळी, धुलिवंदन अन् रंगपंचमीसाठी बाजारपेठ सज्ज! परंतु काळजी घ्या, अन्यथा…

दरम्यान देशात 22 अधिकृत भाषा आहेत ज्यामध्ये भारतीय चलन असलेल्या रूपयाचं चिन्ह स्टॅन्डर्ड प्रॅक्टीस म्हणून सर्व भाषांमध्ये एकच ठेवण्यात आलेले आहे. जे देवनागरी लिपीतील र आणि इंग्रजीतील Ra साठी वापरलं गेलं आहे. मात्र आता शुक्रवारी 14 मार्चला तामिळनाडू राज्याचा 2025-26 या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यासंबधिचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात भारतीय चलन असलेल्या रूपयाचं चिन्ह बदलण्यात आलं आहे. त्यावरून आता संविधानिक वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

follow us