Download App

भाजपला कर्नाटकात झटका, तिकीट नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा

Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत दिवसेंदिवस भाजपसाठी डोकेदुखी वाढत आहे. भाजपमधील काही आमदारांचे तिकीट नाकारल्याने पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे. भाजपला धक्का माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांनी दिला आहे. भाजपने मंगळवारी (12 एप्रिल) कर्नाटक विधानसभा निवडणूकसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत 189 उमेदवारांचा समावेश आहे. जाहीर झालेल्या यादीत लक्ष्मण सवदी यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बुधवारी राजीनामा जाहीर करताना लक्ष्मण सवदी म्हणाले, “मी निश्चितपणे निर्णय घेतला आहे. मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.” गुरुवारी सायंकाळी कठोर निर्णय घेऊन शुक्रवारपासून कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सवदी हे अथणीचे तीन वेळा आमदार आहेत.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद… सुप्रिया सुळे म्हणतात…

मात्र, 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार महेश कुमथल्ली यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. सवदीचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या कुमथल्ली यांना भाजपने आता अथणीचे तिकीट दिले आहे. त्याच वेळी, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी म्हणाले की, 20 एप्रिलपर्यंत कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली जाईल.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिकमंगळूर मतदारसंघातून तिकीट मिळाल्यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी म्हणाले, “मी पक्षाचे आभार मानतो, 189 लोकांच्या यादीत आम्हाला बहुमताचा आकडा मिळेल. सामाजिक समतोलाबरोबरच सुशिक्षित आणि प्रत्येक वर्गातील लोकांना संधी दिली आहे. सर्वांना परस्पर संधी मिळावी आणि नवनवीन प्रयोग होत राहावेत यासाठी पक्ष नेहमीच काम करतो. काही लोक मोठे नेते आहेत, पक्ष त्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढील, असे ते म्हणाले.

Tags

follow us