Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा नवी दिल्लीतील ५, सुनहरी बाग हा नवा पत्ता असण्याची शक्यता आहे. आपल्या निवासस्थानासाठी त्यांनी ५, सुनहरी बाग या बंगल्याची निवड केल्याची माहिती आहे. (Rahul Gandhi) प्रियांका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी यांच्या सहकाऱ्यांनी या बंगल्याची पाहणी केली आहे. हा बंगला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निवासस्थान १०, जनपथ तसंच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या १०, राजाजी मार्ग बंगल्यापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे.
सुप्रीम कोर्टाची स्थगिती धक्कादायक! बापानेच पुसले मुलीचे कुंकू; संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग, जावायचा भोसकून खून
मोदी आडनावांवरून केलेल्या टीकेमुळे मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना २३ मार्च २०२३ रोजी दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यापाठोपाठ दुसऱ्याच दिवशी त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं आणि त्यांना १२, तुघलक लेन बंगला सोडण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार राहुल गांधी यांनी २२ एप्रिल रोजी हा बंगला सोडला. ते काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या १०, जनपथ या निवासस्थानी राहण्यास गेले होते. सूरत न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व कायम राहिलं. त्यांना पुन्हा १२, तुघलक लेन बंगला देऊ करण्यात आला.
बाग बंगल्याची पाहणी नारायण राणेंचा स्वबळाचा नारा; दादा अन् शिंदे सेनेला एकही जागा मिळणार नाही?
राहुल गांधी खासदार म्हणून १२, तुघलक लेन बंगल्यात २००४ पासून १९ वर्षे राहिले. पण तो बंगला पुन्हा घ्यायचा नाही असं ठरवून त्यांनी २०२३ च्या उत्तरार्धात ओसाड पडलेल्या ७, सफदरजंग लेन बंगल्याचीही पाहणीही केली होती. पण वेळेत दुरुस्ती शक्य नसल्यामुळे त्यांनी त्याचाही नाद सोडून दिला. अठराव्या लोकसभेवर पुन्हा निवडून आल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा सफदरजंग लेन भागात वास्तव्यासाठी स्वारस्य दाखवलं होतं. पण आता त्यांनी उद्योग भवन ते कृष्ण मेनन मार्गदरम्यानचा ५, सुनहरी बाग बंगला पसंत केल्याची सूत्रांची माहिती आहे. लोकसभेचे पाचवेळचे खासदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांना माजी केंद्रीय मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील लोकसभेच्या आवास समितीने या बंगल्याची शिफारस केली आहे.