नीती आयोग : ‘इंडिया’चा बहिष्कार पण, ममता बॅनर्जींचा काँग्रेसला झटका
INDIA Alliance on Niti Aayog Meeting: नीती आयोगाच्या बैठकीवरून विरोधी (Niti Aayog Meeting) पक्षांत वेगळ्या वाटा दिसू लागल्या आहेत. काँग्रेसने या बैठकीचा (Congress Party) बहिष्कार केला आहे. पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. बैठकीत अर्थसंकल्पातील राज्यांसाठीची तरतूद आणि केंद्र सरकारकडून (Budget 2024) राज्यांशी होत असलेला भेदभाव असे मुद्दे उपस्थित करण्याचा त्यांचा मनसूबा आहे.
ममता बॅनर्जी यांनी नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन देखील या बैठकीस उपस्थित राहतील असा दावा त्यांनी केला. परंतु, हेमंत सोरेन यांच्याकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. मागील वेळेस त्यांनी या बैठकीत सहभाग घेणार असल्याचे संकेत मात्र दिले होते.
आज राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेत नीती आयोगाची बैठक होणार आहे. सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत पिण्याचे पाणी, विजेची गुणवत्ता, शालेय शिक्षणाचा विस्तार, आरोग्य सुविधा, डिजिटलायजेशन, रजिस्ट्रेशन, म्युटेशन या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
Mamata Banerjee : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ममता बॅनर्जी स्पष्टच बोलल्या, ‘मी सनातन धर्माचा’
या बैठकीत ममता बॅनर्जी उपस्थित राहणार असल्या तरी केंद्र सरकारची भूमिका मात्र वेगळी आहे. पश्चिम बंगालला केंद्रीय बजेटमध्ये कसे वंचित ठेवले गेले याची लेखी माहिती द्या अशा सूचना केंद्राने पश्चिम बंगाल सरकारला दिल्या आहेत. बजेटमध्ये केंद्र सरकारने भेदभाव केला असा आरोप ममता बॅन्रर्जी यांनी केला आहे. या बैठकीत जर त्यांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली तर मी नक्कीच हा मुद्दा उपस्थित करेन, असे बॅनर्जी म्हणाल्या. तसेच नीती आयोग बरखास्त करून त्या जागी पुन्हा योजना आयोग आणण्याची मागणीही त्यांनी केली.
दुसरीकडे इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) घटक पक्षांनी या बैठकीवर बहिष्काराची घोषणा केली आहे. यामध्ये केरळ, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. परंतु, पश्चिम बंगाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दोन्ही मुख्यमंत्री विरोधी आघाडीत आहेत. तरीदेखील त्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे.
बैठकीतही हे दोन्ही मुख्यमंत्री केंद्रावर टीकाच करणार आहेत. परंतु, विरोधी आघाडीच्या वेगळी भूमिका मात्र त्यांनी घेतली आहे. ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहतीलच. पण झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याबाबत अजून खात्रीशीर माहिती नाही. परंतु, या निर्णयामुळे इंडिया आघाडीत सर्व काही आलबेल नाही ही गोष्ट मात्र अधोरेखित झाली आहे.
Union Budget 2024 : एनडीए सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या सविस्तर