Download App

Top Companies : टाटा-बिर्लांनाही टाकलं मागं; कुठली आहे ही कंपनी?, टॉप 500मध्ये मिळवले स्थान

या यादीत सर्वाधिक कंपन्यांची संख्या असलेले शहर आणि देश सिंगापूर आहे. या यादीत सिंगापूरच्या 108 कंपन्यांचा समावेश आहे.

  • Written By: Last Updated:

Tops 2025 List of High-Growth Companies : भारतातील एका नव्या कंपनीने सर्वांनाच चकित केलं आहे. देशातील मोठ्या कंपन्यांना मागे टाकत मोठी घौडदौड केली आहे. या कंपनीचे नाव लेंडबॉक्स आहे. ही NBFC P2P कंपनी आहे. आशिया-पॅसिफिक प्रदेशातील 500 वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांच्या यादीत ती आघाडीवर आहे. फायनान्शिअल टाईम्स आणि स्टॅटिस्टा यांनी संयुक्तपणे ही यादी तयार केली आहे.

एका मॅचसाठी खर्च केला ८६९ कोटी अन् हाती आला भोपळा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तानवर आर्थिक संकट

या यादीत लेंडबॉक्ससोबत इतर काही भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे. यामध्ये ब्लूस्मार्ट सहाव्या क्रमांकावर, मीशो 72व्या क्रमांकावर, टाटा समूहाची टायटन कंपनी 301व्या, आदित्य बिर्ला समूहाची आदित्य बिर्ला कॅपिटल 374व्या आणि हॅवेल्स 396व्या क्रमांकावर आहे. या यादीत 81 भारतीय कंपन्यांची नावे आहेत. ही यादी अशा कंपन्यांची आहे ज्यांनी 2020 ते 2023 दरम्यान त्यांच्या कमाईत सर्वाधिक वाढ केली आहे.

लेंडबॉक्स कंपनी फक्त 10 वर्षांची

लेंडबॉक्स कंपनी फक्त 10 वर्षांची आहे. त्याची सुरुवात 2015 साली झाली. ही कंपनी खूप वेगाने विकसित झाली आहे. लेंडबॉक्सचा महसूल 2023 मध्ये $51 दशलक्षपर्यंत पोहोचला. त्यामुळे कंपनीचा वार्षिक वाढीचा दर 536 टक्के होता.

चिनी कंपन्यांचा समावेश नाही

या यादीत सर्वाधिक कंपन्यांची संख्या असलेले शहर आणि देश सिंगापूर आहे. या यादीत सिंगापूरच्या 108 कंपन्यांचा समावेश आहे. देशांच्या बाबतीत जपान आणि दक्षिण कोरिया दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत दोन्ही देशांच्या 91-91 कंपन्या आहेत. या यादीत सोलमधील 75 आणि टोकियोमधील 71 कंपन्यांचा समावेश आहे. या यादीत चिनी कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. कारण त्यांच्या डेटाची पडताळणी करताना अडचणी येत होत्या.

सर्वात जास्त कोणत्या कंपन्या?

या यादीत सर्वाधिक आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. त्यांचा वाटा 27 टक्के आहे. यानंतर, आर्थिक सेवा म्हणजेच पैशांचा व्यवहार करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांचा वाटा 10 टक्के आहे. त्यानंतर जाहिरात आणि मार्केटींग कंपन्या आहेत. त्यांचा वाटा 5 टक्के आहे. या यादीत समाविष्ट करण्याचे काही नियम होते. कंपनीने 2020 मध्ये किमान $100,000 आणि 2023 मध्ये किमान $1 दशलक्ष कमावायचे होते. याशिवाय, कंपनी स्वतंत्र असायला हवी होती म्हणजेच ती इतर कोणत्याही कंपनीची उपकंपनी नसावी.

शेअर्सची नावं

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2020 ते 2023 दरम्यान कंपनीच्या कमाईत झालेली वाढ ही ऑरगॅनिक असायला हवी होती. ऑरगॅनिक म्हणजे कंपनीने स्वतःच्या मेहनतीने आपली कमाई वाढवली आहे, दुसरी कंपनी विकत घेऊन किंवा इतर कोणत्याही कारणाने कंपनीची वाढ झालेली नसावी.

follow us

संबंधित बातम्या