Live : ऑपरेशन सिंदूर! फक्त 25 मिनिटात पाकचा खेळ खल्लास; पत्रकार परिषदेत सैन्यानं काय सांगितलं?

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी मोठी कारवाई केली.

ऑपरेशन सिंदूर! फक्त 25 पाकिस्तानचा खेळ खल्लास; पत्रकार परिषदेत सैन्यानं सगळं सांगितलं

ऑपरेशन सिंदूर! फक्त 25 पाकिस्तानचा खेळ खल्लास; पत्रकार परिषदेत सैन्यानं सगळं सांगितलं

Operation Sindoor : अखेर भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. भारताने भारताकडून बुधवार (दि. ७ मे २०२५) रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. (Sindoor) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत कधी आणि कुठं काय झालं या सर्व गोष्टींची अपडेट मिळेल.

ऑपरेशन सिंदूर! भारताकडून पहगाम हल्ल्याचा बदला, पाकिस्तानवर स्ट्राईक, ९ दहशतवादी तळं उद्ध्वस्त

समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते. दरम्यान, या हल्ल्यात काय काय नुकसान झालंय, याबाबतची माहिती आणखी समोर आलेली नाही. भारतीय सैन्य दलाकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भारताने केलेल्या या क्षेपणास्त्र हल्ल्यात २ लहान मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Exit mobile version