Download App

Advani Health Updates: अडवाणींना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर, घरीच आराम…

लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांना काल सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते घरीच आराम करत आहे.

BJP leader LK Advani Updates : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांना काल सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते घरीच आराम करत आहे.

मोठी बातमी : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान; अर्थसंकल्प 23 जुलैला 

96 वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर अडवाणी यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बुधवारी 9 वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या प्रतिभा अडवाणी होत्या. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने बुलेटिन जारी केले होते. ते न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली होते. दरम्यान, काल (5 जुलै) रोजी सायंकाळी 5 वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने भाजल्या भाकरी, हाटलं पिठलं; कलेक्टर ऑफिस समोरच महिलांनी मांडल्या चुली

जून महिन्यातही अडवाणींना केले रुग्णायतात दाखल
अडवाणी यांना जून महिन्यातही दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 जून रोजी अडवाणी यांना यावेळी युरोलॉजी विभागाचे डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यांना 27 जून रोजी एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. एम्समध्ये अडवाणी यांची यूरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि जेरियाट्रिक मेडिसिनसह विविध तज्ञांनी तपासणी केली.

भारतरत्न पुरस्काराने अडवाणी सन्मानीत
अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी कराची येथे झाला. 2002 ते 2004 दरम्यान ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 7 वे उपपंतप्रधान होते. यापूर्वी ते 1998 ते 2004 दरम्यान एनडीए सरकारमध्ये गृहमंत्री होते. ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना 31 मार्च रोजी भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले होते.

follow us