Lok Sabha Election 2024 : कुठे पैसे वाटप किंवा काही गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील अॅपवर टाका. तुमच्या मोबाइलच्या लोकेशनवरुन 100 मिनिटांत आमची टीम तिथे पोहोचतील आणि कारवाई करतील असा शब्द मु्ख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी दिला. देशातील लोकसभा निवडणुकांची घोषणा राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. देशात सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. मतमोजणी 4 जून या एकाच दिवशी होणार आहे.
Lok Sabha Election : महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान; निवडणूक आयोगाने जाहीर केल्या तारखा
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर मतदारांसाठी आवश्यक माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मतदान केंद्र सापडण्यात अडचणी येणार नाहीत. तसेच नो युवर कँडीडेट या मोबाइल अॅपवरून निवडणुकीतील उमेदवारांची सगळी माहिती मतदारांना उपलब्ध होईल. निवडणुकीतील हिंसाचार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार आहोत, असे राजीव कुमार म्हणाले.
निवडणुकीची तयारी करताना चार आव्हानं आमच्यासमोर होती. यामध्ये मसल पॉवर, मनी पॉवर आणि अफवा पसरवण्याचं आव्हान होतं. यासाठी आम्ही स्थानिक जिल्हा प्रशासन जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
कुठे पैसे वाटप किंवा काही गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील अॅपवर टाका. तुमच्या मोबाइलच्या लोकेशनवरुन 100 मिनिटांत आमची टीम तिथे पोहोचतील आणि कारवाई करतील असा शब्द मु्ख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला.
Loksabha Election 2024 : राज्यात युती की आघाडी कोण ठरणार भारी? ओपिनियन पोलने भाजपची धाकधूक वाढली