Download App

Lok Sabha Election : BJP-JDS युतीवर संकट? कुमारस्वामींच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!

Lok Sabha Election : दक्षिण भारतातील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजपने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. एकट्याच्या बळावर लोकसभेची निवडणूक जड जाईल असे लक्षात मित्रांची शोधाशोध सुरू करण्यात आली. या प्रयत्नांत भाजपला (BJP) राज्यात मोठा सहकारी मिळाला आहे. भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी युती होण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांतील जागावाटपाची (Karnataka Politics) बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. जर याबाबत सकारात्मक निर्णय झाला तर दोन्ही पक्ष एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढताना दिसतील अशी परिस्थिती असताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (H.D. Kumar Swamy) यांच्या वक्तव्याने नवी ट्विस्ट आला आहे.

G20 Summit 2023 : जागतिक GDP मध्ये G20 देशाचा वाटा किती?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जनता दलाशी युती करेल, असे शुक्रवारी सांगितले होते. यानंतर कुमारस्वामी यांच्या वक्तव्याने मात्र अनिश्चितता निर्माण झाली आहे. कुमारस्वामी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीबाबत या टप्प्यावर काहीही बोलणार नाही. युतीसाठी योग्य वेळ आलेली नाही. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा युतीची घोषणा करण्याआधी नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करतील.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जनता दलाशी युती करेल, असे सांगितले. दोन्ही पक्षांची युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून याबाबत अधिकृत घोषणा 11 सप्टेंबरनंतर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Karnataka Politics : जेडीएस भाजपबरोबर येणार? लोकसभेचे जागावाटप अंतिम टप्प्यात

काय म्हणाले होते येदियुरप्पा ?

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप जनता दलाशी युती करेल, असे सांगितले. दोन्ही पक्षांची युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून याबाबत अधिकृत घोषणा 11 सप्टेंबरनंतर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

जेडीएसला मिळाली फक्त एक जागा

सन 2019 मध्ये जेडीएस आणि काँग्रेस एकत्रित निवडणूक लढले होते. या निवडणुकीत जेडीएसला विशेष काही करता आले नाही. हसन मतदारसंघच जिंकता आला. यानंतर विधानसभा निवडणुकीतही पक्षाची मोठी पिछेहाट झाली. त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला. यानंतर मागील जुलै महिन्यात एचडी देवेगौडा यांनी पक्ष लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले होते. यानंतर मात्र राजकीय गणिते बदलली आहेत. भाजप आणि जेडीएस दोन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढण्यावर विचार करत आहेत. जर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर काँग्रेससाठी मात्र अडचणीचे ठरणार आहे.

Tags

follow us