Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीचे निकाल (Lok Sabha Election Result) काल समोर आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने (NDA) 292 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळं आता भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.
ठाकरे गटात धुसफूस, सर्व मीच करायचं होतं का? खैरेंनी दानवेंवर फोडलं पराभवाचं खापर
17 व्या लोकसभेची मुदत संपत असून लवकरच नवे सरकार स्थापन होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रभवन गाठले आहे. त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला आहे. स्वत: राष्ट्रपतींना ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. मुर्मू यांनी मोदींचा राजीनामा मंजूर केला असू्न आजपासून मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
आम्हाला मान्य नाही, सरकारमध्ये राहुनही काम करता येतं; बावनकुळेंची फडणवीसांना साद
प्रधानमंत्री @narendramodi ने राष्ट्रपति भवन में राष्ट्रपति द्रौपदी मुर्मु से मुलाकात की। प्रधानमंत्री ने अपना और केन्द्रीय मंत्रिपरिषद का त्यागपत्र सौंपा। राष्ट्रपति ने त्यागपत्र स्वीकार करते हुए प्रधानमंत्री तथा उनके सहयोगियों से नई सरकार के गठन तक अपने पद पर बने रहने का… pic.twitter.com/n9yri078uH
— President of India (@rashtrapatibhvn) June 5, 2024
2014 मध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्वाखालील 282 जागा जिंकल्या होत्या. तर 2019 च्या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकून स्वबळावर बहुमत मिळवले होते. मात्र, यावेळी मित्रपक्षांना सामावून घेत एनडीएला बहुमत मिळवण्यात यश आहे.
कालच्या निकालात एनडीएने 292 जागा मिळवल्या तर विरोधकांच्या इंडिया आघाडीला 234 जगाा मिळाल्या आहे. एकट्या भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. एकट्या भाजपला बहुमताचा 272 चा जादुई आकडा गाठता आला नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी नरेंद्र मोदींना चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. तर नायडू आणि नितीश कुमार यांना फोडण्यासाठी इंडिया आघाडी जोरदार प्रयत्न करणार यात शंका नाही. पण, सध्या तरी या दोन्ही पक्षांनी आपण एनडीएसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येऊ शकते.
पंतप्रधान मोदी कधी घेणार शपथविधी?
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा 8 जून रोजी होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. 8 जून रोजी रात्री 8 वाजता शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.